विडूळ : येथे एक वर्षानंतर ग्रामसभा घेण्यात आली. त्यात नव्यानेच निवड झालेल्या ग्रामपंचायतीतील सर्व विषय समित्यांची निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत अन्न नागरी पुरवठा दक्षता समितीची निवड करण्यात आली. २०१७ पासून कार्यरत असलेल्या तंटामुक्त समितीमध्येही बदल करण्यात आला. तंटामुक्त समिती अध्यक्षपदासाठी पंजाबराव दादाराव भालेराव व पांडुरंग नागोबा हरण यांनी दावेदारी केली होती. ग्रामसभेत हात वर करून मतदान घेण्यात आले. त्यात पंजाबराव भालेराव यांना २०१ पैकी १०९, तर पांडुरंग हरण यांना ३५ मते पडली. पंजाबराव भालेराव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या वेळी सरपंच, सचिव, पोलीस पाटील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उमरखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.