राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हळद, संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत सरकारने करावी अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली. अनिल देशमुख यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
शेतकऱ्यांचे प्रश्न असताना दुःखाची अशी गोष्ट आहे की, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे राज्याच्या बाहेर प्रचाराच्या दौऱ्यासाठी व्यस्त आहे. अतिवृष्टीच्या पुराने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र अजून सुद्धा त्या पुराची पैसे शेतकऱ्यांना व नागरिकांना मिळाले नाही याची सुद्धा नुकसान भरपाई या जिल्ह्यामध्ये देण्यात यावी, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
मराठवाडा व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते, मात्र कापसाला भाव मिळत नाही. कापसाची विदेशातून भारतामध्ये आयात करण्यात आले. आयात केल्याच्यानंतर ११ टक्के कॉटन ऑफ इंडिया असोसिएशनच्या दबावाखाली रद्द करण्यात आला. व्यापाराच्या फायद्यासाठी ११ टक्के आयात कमी करण्यात आला. त्यामुळे कापसाचे भाव कमी झाले कापसाची प्रदेशात निर्यात करण्यासाठी सरकार अपयशी ठरले, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली.
मागच्या वर्षी तरी आठ हजार रुपये कापसाला भाव मिळाला मात्र यावेळेस कापसाला भाव सात हजार रुपये आहे. उत्पादन खर्च जास्त आहे, त्याकडे सरकारचं लक्ष नाही कापसाला भाव नसल्याने अतिशय दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांची असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी जे एक महिन्यापासून उपोषण करत आहे त्याच्याकडे सुद्धा राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज आहे कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, असं अनिल देशमुख यावेळी म्हणाले.