के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : सीसीआयला कापूस विकण्याकरिता तीन हजार ६८९ शेतकऱ्यांनी राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली होती. सहकार विभागाद्वारे याचे सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर तब्बल ४० टक्के शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नव्हता, असे आढळून आले आहे. यावरून शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा कापूस विकण्याचा काही महाभागांचा डाव यशस्वी झाला नाही, असे दिसत असले तरी सर्वेक्षणापूर्वीच अर्ध्या नोंदणीतील कापूस विकला गेला होता. काही ‘पोच’ असलेल्यांनी सर्वेक्षणातही जमवून घेतले असल्याने यावेळी अनेकांनी तगडा हात मारला असल्याचे समजते.राळेगाव १७४४, वाढोणा १६००, खैरी ६१२ याप्रमाणे ३६८९ शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री करण्याकरिता नोंदणी केली होती. त्यावेळीच यापैकी अर्धी अधिक नोंदणी बोगस आहे, व्यापाऱ्यांनी आपला कापूस शेतकऱ्यांच्या नावावर विकण्याकरिता केलेली खेळी असल्याची चर्चा सुरू होती. मे, जूनच्या खरेदीत आणि सर्वेक्षणात ते त्याप्रमाणे सिद्धही झाले आहे.नोंदणी झालेल्या ८०९ शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यांच्याद्वारे २५ हजार क्विंटल कापूस सीसीआयला विकण्याचा डाव सर्वेक्षणामुळे अयशस्वी झाला आहे. पण सर्वेक्षणापूर्वी व सर्वेक्षणानंतर जमून गेल्यामुळे आणि जमवून घेतल्यामुळे अनेकजण मालामाल झाले आहे. या काळात तालुका व जिल्ह्याबाहेरूनही कापूस विक्रीस आलेला असल्याने त्यास दुजोरा मिळाला आहे. मे अखेर झालेल्या सर्वेक्षणामुळे शासन व सीसीआयचे होणारे नुकसान टळले. मात्र सुरुवातीलाच संपूर्ण नोंदणीचे सर्वेक्षण झाले असते तर नुकसानीचा आकडा आणखी कमी झाला असता.मेपूर्वी व मेमध्ये खरेदी केलेल्या वाहनात दररोज २० टक्के वाहने नोंदणी असूनही आलेली नव्हती. तर सर्वेनंतर जूनमध्ये हेच प्रमाण पाच टक्क्यांवर आले. यावरून बरेच काही स्पष्ट होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी गैरप्रकार करण्याची शक्यता नाही. हाती असलेल्या अधिकाराचा वापर स्वत:करिता आणि आपल्या लोकांकरिता काहींनी शेतकऱ्यांच्या नावावर करून घेतल्याची चर्चा गेली दोन महिन्यांपासून सर्वत्र सुरू राहिली आहे. या सपूर्ण गैरप्रकाराची चौकशी झाल्यास वास्तविकता आणि त्यामागील सूपीक डोक्यांची चेहरे पुढे येऊ शकतात.२१७० शेतकऱ्यांचे सर्वेक्षणवरिष्ठांच्या आदेशाने राळेगाव तालुक्यातील २१७० शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील ८०९ शेतकऱ्यांकडे विक्रीकरिता कापूस शिल्लक नसल्याचे आढळून आले. काही शेतकऱ्यांनी कापूस खासगीत विकला असल्याचे सांगितले. कापूस विक्रीच्या यादीत नावे दोनदा आल्याने काही शेतकऱ्यांची नावे रद्द करण्यात आली. ४४६ शेतकऱ्यांची नावे नव्याने नोंदणी करण्यात आली. त्याचेही सर्वेक्षण करण्यात आले, अशी माहिती राळेगावचे सहायक निबंधक ए.टी. खताडे यांनी दिली.राळेगाव केंद्रावर सीसीआयची सोमवारी, तर वाढोणा केंद्रावरील खैरीतील कापूस खरेदी या आठवड्यात पूर्णत्वास जाणार आहे.मेमध्ये खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे प्रथमच १०-१५ दिवसात देण्यात आले. शेतकऱ्यांना हा पैसा पेरणीसाठी वेळेवर उपयोगी पडणारा आहे.
४० टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापूसच नव्हता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 5:00 AM
राळेगाव १७४४, वाढोणा १६००, खैरी ६१२ याप्रमाणे ३६८९ शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री करण्याकरिता नोंदणी केली होती. त्यावेळीच यापैकी अर्धी अधिक नोंदणी बोगस आहे, व्यापाऱ्यांनी आपला कापूस शेतकऱ्यांच्या नावावर विकण्याकरिता केलेली खेळी असल्याची चर्चा सुरू होती. मे, जूनच्या खरेदीत आणि सर्वेक्षणात ते त्याप्रमाणे सिद्धही झाले आहे.
ठळक मुद्देनोंदणीच्या सर्वेक्षणात बिंग फुटले : तरीही कापूस विकण्याचा गेम यशस्वी