शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

शिवसैनिक सुनील डिवरे हत्याकांडातील चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2022 10:35 AM

भांबराजा येथील सरपंच महिलेचे पती सुनील डिवरे यांची मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी सकाळीही कायम होते.

ठळक मुद्देमामाकडे घेतला होता आश्रयविद्यालयाच्या अध्यक्ष निवडीवरून होता वाद

यवतमाळ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच शिवसैनिक सुनील नारायण डिवरे यांची गुरुवारी सायंकाळी भांबराजा येथे घरातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील प्रमुख तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासांतच अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली देशी पिस्टलही जप्त केली.

पवन प्रभाकर सोननकर (२५), वैभव प्रभाकर सोननकर (२३), रोहित राजेंद्र भोपडे (२१) रा. भांबराजा या तिघांना लोहारा येथून गुरुवारी रात्री ९.३० वाजता अटक केली. तर सुरेश चिंगोजी पात्रीकर हे पोलीस ठाण्यात शरण आले. दरम्यान, या हत्याकांडानंतर गुरुवारी रात्री भांबराजा येथील सरपंच अनुप्रिता सुनील डिवरे यांनी पतीच्या खुनाची तक्रार दिली. सात आरोपींनी संगनमत करून खून केल्याचे या तक्रारीत नमूद आहे. भांबराजा येथील नेहरू विद्यालयाच्या अध्यक्षपदाची निवडणूक तीन वर्षांपूर्वी झाली होती.

या निवडणुकीत सुनील डिवरे यांच्याशी आरोपींनी वाद घालत जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली होती. तशी तक्रारही ग्रामीण पोलीस ठाण्यात डिवरे यांनी तेव्हा दाखल केली होती. त्यानंतर ग्रामस्थांच्या तक्रारीवरून ग्रामपंचायतीने भांबराजा येथील अतिक्रमण काढले. हे अतिक्रमण पूर्ववत लावून द्या, असे म्हणत सातही आरोपींनी हल्ला करून पतीला ठार केल्याचे सरपंच अनुप्रिता यांनी तक्रारीत नमूद केले. त्यावरून ग्रामीण पोलिसांनी पवन प्रभाकर सोननकर, वैभव प्रभाकर सोननकर, रोहित राजेंद्र भोपडे, रामू किसन जयस्वाल, अमर किसन जयस्वाल, सूरज श्रावण मनवर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख प्रदीप परदेशी, विनोद राठोड, नीलेश राठोड, बंडू डांगे, बबलू चव्हाण, सुधीर पिदूरकर, उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर यांनी कारवाई केली.

तीन आरोपी पसार

आरोपींना देशी पिस्टलसह अटक केली. गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड व दुचाकीचा शोध घेतला जात आहे. पसार आरोपी अमर जयस्वाल याची कार (एमएच-२९-एआर-७७११) नेर येथे आढळून आली. नेर पाेलिसांनी ही कार ताब्यात घेतली आहे. गुन्ह्यातील तीन आरोपी अजूनही पसार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक