शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

प्रवाशाची चार लाखांची चोरी होऊनही ‘एसटी’ बेजबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:43 PM

चार लाख रुपये असलेली पिशवी चोरी गेल्याचे सांगूनही बस पोलीस ठाण्यात नेण्याचे टाळल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने ‘एसटी’ला दणका दिला. महिला वाहकाचा बेजबाबदारपणा महामंडळाला भोवला. महामंडळाने प्रवाशाला भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य अ‍ॅड.आश्लेषा दिघाडे आणि रमेशबाबू सिलिवेरी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देदंड ठोठावला : जिल्हा ग्राहक न्यायालयाचा दणका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चार लाख रुपये असलेली पिशवी चोरी गेल्याचे सांगूनही बस पोलीस ठाण्यात नेण्याचे टाळल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने ‘एसटी’ला दणका दिला. महिला वाहकाचा बेजबाबदारपणा महामंडळाला भोवला. महामंडळाने प्रवाशाला भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य अ‍ॅड.आश्लेषा दिघाडे आणि रमेशबाबू सिलिवेरी यांनी दिला आहे.आकपुरी (ता.यवतमाळ) येथील मंगेश जयवंत भोयर आणि लक्ष्मीबाई जयवंत भोयर यांनी दाखल केलेल्या तक्रार प्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे. २७ आॅगस्ट २०१२ रोजी सदर दोघे घाटंजी येथे जाण्यासाठी बसमध्ये बसले. दरम्यान, जवळ असलेली चार लाख रुपयांची पिशवी चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. कारेगाव ते वडगाव दरम्यान हा प्रकार घडल्याचे त्यांनी बसच्या महिला वाहकाला सांगितले. बस वडगाव पोलीस ठाण्यात नेण्याची विनंती केली. मात्र महिला वाहकाने त्यांची विनंती नाकारत थांब्यावर बस थांबविली. त्यावेळी याठिकाणी बरेच प्रवासी उतरले.यानंतरही सदर बस वडगाव पोलिसात न नेता घाटंजी येथे नेण्यात आली. याठिकाणी पोलीस ठाण्यात बसमधील सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वेळ निघून गेली होती. पैसे चोरी गेल्याची तक्रार वडगाव (जंगल) पोलीस ठाण्यात करण्यात आली. तसेच एसटी महामंडळाकडेही भरपाईची मागणी केली. परंतु महामंडळाने ही जबाबदारी झिडकारली. अखेर भोयर यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. कारवाई दरम्यान महामंडळातर्फे संबंधितांची सातत्याने गैरहजेरी होती. या प्रकरणात निकाल देताना मंचाने म्हटले आहे, बसमधील प्रवाशांच्या जीविताची व मालमत्तेची काळजी घेणे बसचालक व वाहकाची जबाबदारी असते. असे असतानाही सदर प्रकरणात बसवाहकाने जबाबदारी पार पाडल्याचे दिसून येत नाही. बसवाहकाने त्रूटीपूर्ण व्यवहार करून प्रवाशाला सदोष सेवा दिली. महामंडळाने तक्रारकर्ते भोयर यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी पाच हजार रुपये आणि तक्रार खर्चाचे दोन हजार रुपये द्यावे, असा आदेश मंचाने दिला आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळtheftचोरी