ऑनलाईन लोकमतघाटंजी : येथील बसस्थानक परिसरातील चार दुकानांना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले. नागरिकांनी प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळविले. आग कोणत्या कारणाने लागली, हे मात्र कळू शकले नाही.घाटंजी बसस्थानकाजवळील पारवा पॉर्इंटजवळील रजा ईलेक्ट्रॉनिक्स, भारत गादी कारखाना, जमजम कोल्ड्रींक्स व रजा आॅटोबाईल्स दुकानाला गुरुवारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत चारही दुकानातील साहित्य खाक झाले. आगीची माहिती मिळताच नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली. अनेकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी प्रयत्न करून पहाटे ४ वाजता आग आटोक्यात आणली.या आगीत ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी सकाळी तहसीलदार जी.के. हामंद, ठाणेदार गणेश भावसार व चमूने घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. त्यात ४० लाखांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला आहे.
घाटंजीत चार दुकानांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 11:45 PM
येथील बसस्थानक परिसरातील चार दुकानांना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले.
ठळक मुद्दें४० लाखांचे नुकसान : नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला