शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

वर्धा नदीत चौघे वाहून गेले; तिघांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 11:45 AM

वणी तालुक्यातील नायगाव व जुनाडा येथील घटना

वणी(यवतमाळ: दोन वेगवेगळ्या घटनेत नदीवर पोहण्यासाठी गेलेले चार तरुण वाहून गेले. ही घटना मंगळवारी स्वातंत्र्य दिनी सायंकाळी वणी तालुक्यातील नायगाव (खु.) व जुनाडा येथे घडली. ही दोनही गावे वर्धा नदीच्या काठावर आहेत. पैकी जुनाडा येथून वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह तसेच नायगाव येथून वाहून गेलेल्या दोघापैकी एकाचा असे तीन मृतदेह शोध मोहिमदरम्यान आढळले असून एकाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

रितेश नत्थू वानखडे (१८) व आदर्श देवानंद नरवाडे (२०) दोघेही रा. भद्रावती ( जि. चंद्रपूर) अशी जुनाडा येथून वर्धा नदीत वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. नायगाव खुर्द येथील प्रविण सोमलकर (३६) दिलीप कोसरकर (४०) हे दोघे वर्धा नदीत वाहून गेले. यापैकी प्रविणचा मृतदेह सापडला असून दिलीपचा शोध घेतला जात आहे.

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी सुटी असल्याने अनेकजण पर्यटनासाठी नदी तसेच धबधब्यावर जातात. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने नदीच्या जलपातळीत चांगलीच वाढली आहे. या प्रवाहात पोहण्याचा मोह   न आवरता आल्याने ही दुर्घटना घडली.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूYavatmalयवतमाळ