शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

बोगस सोसायटीद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Published: August 07, 2016 1:13 AM

कर्जाचे आमिष दाखवून फसविणाऱ्या बोगस सोसायटीच्या संस्थाचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ...

कर्जाचे आमिष : उपनिबंधक कार्यालयावर वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शेतकऱ्यांची धडक वणी : कर्जाचे आमिष दाखवून फसविणाऱ्या बोगस सोसायटीच्या संस्थाचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी उपविभागातील शेतकऱ्यांनी येथील सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्थेत धडक दिली. लगतच्या चिखलगाव येथील नियोजित वणी अर्बन क्रेडिट को-आॅपरेटीव्ह सोसायटीने शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता खत, बी-बियाणे व इतर साहित्य खरेदीसाठी कमी व्याज दरात कर्ज देण्याचे ठरविले. त्यानुसार वणी, मारेगाव व झरी तालुक्यात या सोसायटीने पत्रके वाटून शेतकऱ्यांनी कर्ज घ्यावे म्हणून काही एजंटांनी प्रचार केला. खरीप हंगामात शेतीसाठी पैैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या सोसायटीच्या मोहात पडून चिखलगाव येथील नियोजित सोसायटी गाठली. तेथे संस्थाध्यक्ष व प्रबंधकांनी प्रत्येक शेतकऱ्यांकडून एक हजार ६०० रूपये, शेतीचा सातबारा, आधार कार्ड, राशन कार्ड, दुसऱ्या बँकेचे दोन कोरे धनादेश घेऊन संस्थेचे भागीदार बनविले. त्यानंतर या संस्थेने शेतकऱ्यांकडून शेतीच्या क्षेत्रफळाच्या आधारे खत-बियाणे खरेदीसाठी २० हजार ते एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज मंजूर केले. तसेच कृषी केंद्राच्या नावाने हमीपत्र दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ओळखीच्या तसेच गावातील कृषी केंद्रातून मंजुर कर्जाइतके कृषी साहित्य खरेदी केले. परंतु सदर संस्थेने दोन महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांच्या नावाने मंजूर असलेली रक्कम कृषी केंद्र चालकांच्या खात्यावर जमाच केली नाही. त्यामुळे हे कृषी केंद्र चालक आता शेतकऱ्यांना पैशासाठी तगादा लावत असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उत्पन्न घेण्यापूर्वीच कृषी केंद्र चालकांचे पैसे कोठून द्यावे, हा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. कृषी केंद्र चालकांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी सोसायटी गाठून मंजुर कर्जाची मागणी केली. परंतु संस्थाध्यक्ष आगलावे यांनी शेतकऱ्यांना सोसायटीतून हाकलून लावले. याबाबत येथील सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्थेत विचारपूस केली असता, नियोजित वणी अर्बन के्रडीट को-आॅपरेटीव्ह सोसायटी नावाच्या संस्थेची नोंदणीच नसल्याचे उघडकीस आले. सदर सोसायटीने अवैधरीत्या कर्ज वाटप व्यवहार करून वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, यवतमाळ व इतर तालुक्यातील हजारो गोरगरिब शेतकऱ्यांना सभासद बनविले. त्यांच्याजवळून प्रत्येकी एक हजार ६०० रुपये घेऊन फसवूणक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे या संस्थेची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे व कागदपत्रे परत द्यावी, संस्थेचे संचालक व अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी सहाय्यक उपनिबंधक व पोलिसांकडे केली. (कार्यालय प्रतिनिधी) मनसेची सहायक उपनिबंधकांकडे तक्रार या प्रकरणी वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना या गंभीर प्रकाराबाबत माहिती दिली. उंबरकर यांनी लगेच या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन सहाय्यक उपनिबंधक कार्यालय व पोलीस ठाणे गाठले. यावेळी सहाय्यक उपनिबंधक या प्रकरणी कारवाई करण्यासाठी गंभीर नसल्याचे लक्षात येताच राजू उंबरकर यांनी त्यांची कानउघाडणी करून संस्थाध्यक्षाला अटक करण्याचीही मागणी केली. गेल्या २६ जुलैैपासून शेतकऱ्यांनी तक्रार करूनही उपनिबंधक अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्यामुळे उंबरकर व शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, श्रीकांत थेरे, संतोष कोनप्रतीवार, धनंजय त्रिंबके, आजिद शेख, मयूर घाटोळे, राहूल कुचनकार, हिमांशू बोहरा, निखील घाटे, इरशाद खान, शुभम पिंपळकर, शुभम भोयर, रामा परचाके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.