लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आलेले हे सरकार शिवरायांच्या धोरणाविरोधात काम करीत आहे. शिवरायांनी श्रीमंतांना लुटून गरिबांना दान केले. मात्र हे सरकार गरिबांना लुटून निरव मोदीला वाटत आहे. यावरून सरकारची नियत साफ नसल्याचेच स्पष्ट होते. कर्जमाफीच्या घोषणेला वर्षे लोटले तरी शेतकऱ्यांच्या पदरात पैसे पडले नाही, असा घणाघात करीत माजी खासदार नाना पटोले यांनी कर्जमाफीच्या घोषणेचा पंचनामा केला.येथील तिरंगा चौकात शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारी ‘कर्जमाफीचा पंचनामा’ आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून पटोले बोलत होते.मुख्यमंत्र्यांचा वचक संपला - शेट्टीखासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवरील वचक संपल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारच्या कामकाजाचा खरपूस समाचार घेतला. पुढल्या काळात ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद मोदीला घालू लात’, असाच नारा द्यायला हवा असे ते म्हणाले.गुंड मोकाट, आंदोलकांना धाकशेतकऱ्यांनी आंदोलन करू नये म्हणून पोलीस निरीक्षकांनी गावांमध्ये नोटीस बजावल्या. गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. हा प्रकार हुकुमशाहीचा असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. गुंड मोकाट आणि आंदोलकांना धाक दाखविला जात आहे, याबाबत पोलीस अधीक्षकांना जाब विचारला जाईल असे ते म्हणाले.मंचावर खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विधानपरिषद सदस्य हरिभाऊ राठोड, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विजयाताई धोटे, समितीचे निमंत्रक देवानंद पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, गजानन अमदाबादकर, राजेंद्र हेंडवे, अशोक भुतडा आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी २८ जून रोजी कर्जमाफीची घोषणा केली होती. या घटनेला वर्ष पूर्ण झाले. यामुळे माजी खासदार नाना पटोले यांनी वर्षश्राद्धाची खिर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पाजण्यात आली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या. शेतकºयांची फसवणूक केली. त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्याचा पंचनामा शेतकऱ्यांपुढे करण्यात आला.माजी मंत्र्यांचा विरोध झुगारुन नानांची एन्ट्रीकाँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी या आंदोलनाला उपस्थित राहू नये म्हणून येथील काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्षांपर्यंत फिल्डींग लावली होती. परंतु या दोन ज्येष्ठ नेत्यांचा विरोध झुगारुन नानांनी हजेरी लावल्याने या नेत्यांची पक्षाच्या ‘प्रदेश’वरील पकड किती हे स्पष्ट झाले आहे. त्यातच जिल्ह्यातील काँग्रेसच्या एक विद्यमान व दोन माजी आमदारांनीही या आंदोलनाच्या व्यासपीठावर उघडपणे हजेरी लावल्याने पक्षातील नेत्यांमध्ये असलेली गटबाजी पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.गर्दीचा फुगा फुटलाशेतकरी आंदोलनाच्या निमंत्रकांनी जिल्हाभर दौरे करून व ठिकठिकाणी पत्रपरिषदा घेऊनही आंदोलनाला गर्दी जमविता आली नाही. यावरून शेतकऱ्यांनी आंदोलनाला मुळातच प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट होते. पाऊस व पेरणीचे दिवस असल्याने किमान तीन हजार आंदोलक येतील, असा दावा केला जात होता. मात्र तेवढीही उपस्थिती न झाल्याने गर्दीच्या अपेक्षेचा आयोजकांचा फुगा फुटला.
फसव्या कर्जमाफीचा पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 10:31 PM
शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आलेले हे सरकार शिवरायांच्या धोरणाविरोधात काम करीत आहे. शिवरायांनी श्रीमंतांना लुटून गरिबांना दान केले. मात्र हे सरकार गरिबांना लुटून निरव मोदीला वाटत आहे. यावरून सरकारची नियत साफ नसल्याचेच स्पष्ट होते.
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आंदोलन : गरिबांना लुटा अन् नीरव मोदीला वाटा-पटोले