लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी बोगस बियाणे, खत व कीटकनाशकांमुळे जेरीस आले आहे. कीटकनाशकांमुळे फवारणीतून २०१७ मध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी दीडशे जणांना विषबाधा झाली. या पार्श्वभूमीवर एक मोठे रॅकेट उघडकीस आले. आता या प्रकरणात २५ लाखांचे डिलिंग झाल्याची चर्चा आहे. दोषारोपपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावरून एकूणच प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.बनावट बियाणे आणि सुक्ष्म अन्नद्रव्यांचे पॅकिंग करणारा कारखानाच तपासात हाती लागला. यात कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. थेट महानगरापर्यंत या आरोपींची लिंक होती. हा कारखाना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ निर्माण झाली. काही दिवसानंतर यातील प्रमुख आरोपींना अटक झाली. आता या प्रकरणात दोषारोपपत्र सादर केले जाणार आहे. समाजात दहशत ठेवून शेतकºयांना ठगविणाºया आरोपींनी मोठे डिलिंग केले आहे. २५ लाखात प्रकरण ‘मॅनेज’ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.यामध्ये ‘विशाल’ हृदयाच्या एकाची भूमिका महत्वपूर्ण आहे. सुरुवातीला दहा लाख व नंतर पाच लाख रुपये एका चारचाकी वाहनात आरोपीच्या निकटवर्तीयांनी टाकले. आता तर उर्वरित दहा लाखांसाठी आरोपीच्या शेतातीच नोटरी करून घेतली. यामध्येही ‘हजारो’ रूपयांची भूमिका महत्वपूर्ण ठरली. प्रकरणात सुरक्षा म्हणून आरोपींचे कोरे चेकही घेण्यात आले. यासह काही इतरही दस्तावेज ओलीस ठेवले आहे. आता हे दस्तावेज परत मिळविण्यासाठी खटपट सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजलेल्या प्रकरणातही थेट डिलिंग होत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळातच सुरू आहे.
बनावट बियाणे, खतप्रकरणात झाले २५ लाखांचे डीलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 9:40 PM
जिल्ह्यातील शेतकरी बोगस बियाणे, खत व कीटकनाशकांमुळे जेरीस आले आहे. कीटकनाशकांमुळे फवारणीतून २०१७ मध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी दीडशे जणांना विषबाधा झाली. या पार्श्वभूमीवर एक मोठे रॅकेट उघडकीस आले. आता या प्रकरणात २५ लाखांचे डिलिंग झाल्याची चर्चा आहे. दोषारोपपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावरून एकूणच प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
ठळक मुद्देराज्यात गाजले प्रकरण : दहा लाखांसाठी शेताची नोटरी