लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन गरिब होतकरू मुलांसाठी यवतमाळात मोफत मार्गदर्शन वर्ग चालविले जातात. त्यामुळे गरिबांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली आहे, असे प्रतिपादन माजी उपशिक्षणाधिकारी देवीदास डंभे यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोफत मार्गदर्शन वर्गाच्या सत्कार समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद अजमिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शिक्षण समितीचे नवनियुक्त सदस्य राजूदास जाधव, देवीदास डंभे, सतीश भोयर, डॉ. मुश्ताक शेख, प्रमोद कांबळे, राजकुमार भीतकर, आनंद कसंबे, प्रभाकर रुंदे, विनोद इंगळे, कृष्णराव टाके, एम.के. कोडापे उपस्थित होते.सेवेचे व्रत चालविताना अडचणी निर्माण केल्या जातील. समाजाचे वाटोळे करणारे तुमच्यावर टीकाही करतील, परंतु त्यांना आम्ही घाबरत नाही. राष्ट्रसंतांच्या व फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने काम करणारा कार्यकर्ता अडचणींना घाबरत नाही, असे मत राजूदास जाधव यांनी व्यक्त केले. या मार्गदर्शन वर्गाची मी अनेक मुलांकडून यापूर्वीच माहिती घेतली होती. हा वर्ग पूर्णत: मोफत आहे. उन्हाळे गुरुजी व त्यांचे सहकारी कोणतेही शुल्क स्वीकारत नाही. गरिबांच्या मुलांना मोफत मार्गदर्शन करीत असल्याबद्दल मला या उपक्रमाचा अभिमान वाटतो, असे मत निवृत्त उपशिक्षणाधिकारी देवीदास डंभे यांनी व्यक्त केले. पुढचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली जाईल, असे डॉ. मुश्ताक शेख यांनी स्पष्ट केले. मोफत मार्गदर्शन वर्गामुळे सुसंस्कारित समाज निर्माण होईल, असे मत सतीश भोयर यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उन्हाळे गुरुजी तर सूत्रसंचालन विजय साबापुरे यांंनी केले.
मोफत वर्गाने शिक्षणाची गंगा गरिबांपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:30 PM
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन गरिब होतकरू मुलांसाठी यवतमाळात मोफत मार्गदर्शन वर्ग चालविले ...
ठळक मुद्देदेवीदास डंभे : दहावी-बारावीच्या गुणवंतांचा सत्कार