लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हरवलेल्या, पळवून नेलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे सध्या ऑपरेशन मुस्कान राबविले जात आहे. त्यात जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेसोबत समन्वय साधून शोध घेतला जात आहे. मात्र घरातील छोट्या छोट्या गोष्टींना कंटाळलेली मुले पळून जात असल्याचे वास्तव पुढे येत आहे. तर काही अल्पवयीन मुली देखील खोट्या ‘ग्लॅमरला’ भाळून घर सोडून जात असल्याचे दिसले. मात्र परगावात पोहोचल्यानंतर चक्क देहाचा सौदा केला जातो. ऑपरेशन मुस्कानमधून अशा अनेकींना सुदैवाने संरक्षण मिळाले.
पोलीस आणि बालकल्याण विभाग घेतो काळजीऑपरेशन मुस्कानबाबत पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी नुकतीच आमची बैठक घेऊन सूचना दिल्या. पोलीस दलाने ही मुले शोधल्यानंतर बालकल्याण विभाग त्यांची काळजी घेते. पालकांचा शोध न लागल्यास त्यांना बालगृहात संपूर्ण व्यवस्था करून सांभाळले जाते. - ज्योती कडू, जिल्हा महिला बालविकास अधिकारी
हरवलेल्या मुला-मुलींच्या करूण कहाण्यापुसदमधील एका गरीब कुटुंबातील भाऊ-बहीण कंटाळून पळाले होते. आई-वडील भिक्षा मागायला लावत असल्याची त्यांची तक्रार आहे. यातील मुलगा जबलपूरमध्ये तर मुलगी अकोल्यात सापडली. त्यांना बालगृहात ठेवले आहे. तर सापडलेल्या मुलींपैकी काही जणी तरी सोशल मीडियातील मित्रांनी ‘तुला हिरोईन करतो’ असे सांगताक्षणी त्यांच्यासोबत निघून गेल्याचे धक्कादायक वास्तवही ऑपरेशन मुस्कानमधून उघडकीस आले आहे.