लोकमत न्यूज नेटवर्कवणी : हॉलंड देशामध्ये मिस्टर ग्रीट विल्डर या खासदाराने इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांचे कार्टून फोटो टाकल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील मुस्लिम समाजबांधवांतर्फे शहरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.शुक्रवारी दुपारी २.३० वाजता नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव शासकीय मैदानाजवळ एकत्र आले. त्यानंतर शहरातील टिळक चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, दीपक टॉकीज परिसर, श्याम टॉकीज, खाती चौकमार्गे हा मोर्चा वणी तहसीलवर धडकला. यावेळी ११ जणांच्या एका शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. या मोर्चाचे नेतृत्व रज्जाक पठाण, नईम अजीज, शेख ईजहार, शादीर खान, सिद्दीक रंगरेज, शेख जम्मू, सै.शकील, अहेसानुल हक इमरान खान यांनी केले. यावेळी शेकडो मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. मोर्चात ठाणेदार बाळासाहेब खाडे व वाहतूक निरीक्षक संग्राम ताठे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
वणीत मुस्लिम समाजबांधवांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:48 PM
हॉलंड देशामध्ये मिस्टर ग्रीट विल्डर या खासदाराने इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांचे कार्टून फोटो टाकल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील मुस्लिम समाजबांधवांतर्फे शहरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
ठळक मुद्देहॉलंड येथील घटनेचा निषेध : दोषींवर कारवाई करण्याची मागणी