लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डिझेल, पेट्रोल, गॅस सिलिंडरसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेनेच्यावतीने आर्णी, बाभूळगाव आणि दारव्हा येथे आंदोलन करण्यात आले.आर्णी येथे शिवसेनेच्यावतीने डफडी बजाव आंदोलन केले. मुख्य मार्गाने डफडी वाजवत शिवसैनिक तहसीलवर पोहोचले. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रवी राठोड, अनुप जाधव, लिंगाजी मंगाम, निखिल नगराळे, उत्तम राठोड, दिनेश कर्णवार, पवन वाघमारे, महादेव फेंडर, बाळू राठोड, मंगेश पारधी, गुड्डू देठे, गुड्डू पेशवे, रामेश्वर जाधव, अमरदीप गावंडे, दीपक कुजरूपवार, आदित्य लोणसने, गणेश भगत, स्वप्नील राऊत उपस्थित होते.बाभूळगाव तहसीलवर शिवसैनिकांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. मोर्चाचे नेतृत्व तालुका प्रमुख जनार्दन झाटे, शहर प्रमुख नंदकिशोर अडेकर, गजानन पांडे यांनी केले. यावेळी रमेश पराते, विजय गलाट, रंजनाताई घटे, रवींद्र दांदळे, गजानन वानखडे, रूपेश कुईटे, पुरुषोत्तम पुसनाके, दिनेश सोयाम, गोविंद झिटे, विक्रम लकडे, नरेश बोरडे उपस्थित होते. निवेदन नायब तहसीलदार एम.बी. मेश्राम यांनी स्वीकारले.दारव्हा येथील शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत तहसीलवर मोर्चा नेला. उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले. आंदोलनात जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीधर मोहड, तालुका प्रमुख मनोज सिंगी, शहर प्रमुख सुधीर दातीर, पंचायत समिती सभापती उषा चव्हाण, उपसभापती पंडित राठोड, जिल्हा परिषद सदस्य कालिंदा पवार, राधा थरकडे, उपतालुका प्रमुख अजय गाडगे आदी सहभागी झाले होते.
शिवसेनेचा आर्णी, दारव्हा, बाभूळगाव येथे मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:30 AM
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डिझेल, पेट्रोल, गॅस सिलिंडरसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेनेच्यावतीने आर्णी, बाभूळगाव आणि दारव्हा येथे आंदोलन करण्यात आले.आर्णी येथे शिवसेनेच्यावतीने डफडी बजाव आंदोलन केले. मुख्य मार्गाने डफडी वाजवत शिवसैनिक तहसीलवर पोहोचले. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रवी राठोड, अनुप ...
ठळक मुद्दे प्रशासनाला निवेदन : पेट्रोल, डिझेल भाववाढीविरोधात आंदोलन