लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्या वतीने तीन दिवसीय कॅडर ट्रेनिंग कॅम्प जलाराम मंदिर सभागृहात घेण्यात आला. शिबिराच्या उद्घाटनानंतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून सरकारच्या धोरणाविरोधात आक्रोश नोंदविला.अतिक्रमण जमिनीचे पट्टे, घरकुल, शौचालय, विहरी व इतर अनुदानाच्या योजना योग्य लाभार्थ्यांना मिळत नाही, थकित अनुदान हप्ते मिळत नाही. राशन कार्ड व धान्य मिळत नाही. वृद्ध, अपंग, निराधारांचे अर्ज मंजूर होत नाही. प्रत्येक कार्यालयात दलालांच्या मार्फत फसवणूक सुरू आहे. कर्मचारी वेळेवर भेटत नाही. त्यामुळे त्यांचे मुख्यालयी वास्तव्य सक्तीचे करा, ग्रामीण मुलांना निवासी उच्च दर्जाच्या शाळा सुरू करा, शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला भाव, जंगली जनावरांपासून सुरक्षा, जनावरांना धरणातून पिण्याचे पाणी सोडा, दिवसा वीजपुरवठा, भरमसाठ विजबिल, बेरोजगारांना मुद्रा लोन, अशा ज्वलंत मुद्यांसाठी आंदोलन करण्यात आले.तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य घोषित करा, घाटंजीत एसडीओ कार्यालय सुरू करा, घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार हामंद यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. शिबिराचे उद्घाटक राम नेवले व प्रमुख मार्गदर्शक पीबीआयचे राष्ट्रीय संयोजक आचार्य संतोषानंद अवधुत, प्रा. हरिशंकर मंडाले, डॉ. साहेबराव धोत्रे , अण्णाजी राजेधर, अरुण केदार, सुनील चोखारे, मुकेश मासूरकर, रंजना मामर्डे, माणिकदास टोंगे महाराज, घनश्याम पुरोहित, परेश कारिया, मनोज चौहान, अॅड. सिन्हा, दिलीप उमरे, विवेक डेहनकर, हरिभाऊ घोरदडे, मारोती येवले, सुनिल सरोदे, हरिभाऊ पेंदोर यांची उपस्थिती होती.सूत्रसंचालन मधुकर निस्ताने यांनी केले. प्रास्ताविक मोरेश्वर वातिले व आभार अमोल बाहेकर यांनी मानले. राजू विरदंडे, मोहन पवार, मधुसूदन मोहुर्ले, विमल राऊत, श्रीराम वाढई, गोपाल नामपेल्लीवार, रमेश सोळंके, अशोक जयस्वाल, श्रीराम मस्के, नरेंद्र धनरे, विभाश कोटनाके, प्रफुल्ल राऊत, रवी जाधव, संदीप मेश्राम, रवी दूधकोहळ, भीमराव सोयाम आदींनी परिश्रम घेतले.
घाटंजी येथे प्राऊटिस्टचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 9:44 PM
प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्या वतीने तीन दिवसीय कॅडर ट्रेनिंग कॅम्प जलाराम मंदिर सभागृहात घेण्यात आला. शिबिराच्या उद्घाटनानंतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून सरकारच्या धोरणाविरोधात आक्रोश नोंदविला.
ठळक मुद्देसरकारविरुद्ध घोषणा : जलाराम मंदिरात कॅडर ट्रेनिंग कॅम्प