शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेवर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 7:43 PM

Yawatmal News गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या चकमकीत मरदीनटोला पहाडी क्षेत्रात ठार झालेला जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याच्यावर सोमवारी सायंकाळी वणीलगतच्या लालगुडा परिसरातील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 यवतमाळ : गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या चकमकीत मरदीनटोला पहाडी क्षेत्रात ठार झालेला जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याच्यावर सोमवारी सायंकाळी वणीलगतच्या लालगुडा परिसरातील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या नेतृत्वात वणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मिलिंद तेलतुंबडे याचा मृतदेह गडचिरोली येथील पोलिसांच्या चोख बंदोबस्तात वणीत आणण्यात आला. यावेळी गडचिरोली येथून पीएसआय बिरादर यांच्या नेतृत्वात कमांडोच्या तीन तुकड्या वणीपर्यंत सोबत होत्या. मिलिंद तेलतुुंबडे याचा पुतण्या ॲड.विप्लव तेलतुंबडे यांच्या लालगुडा परिसरातील घरी मृतदेह पोहोचल्यानंतर नातलगांनी तेथे अंत्यदर्शन घेतले. या ठिकाणी बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर, अंत्ययात्रा काढण्यात आली.

लालगुडा परिसरातील स्मशानभूमीत मिलिंद तेलतुंबडे याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याची आई अनुसया तेलतुंबडे, पत्नी अंजला, बहिणी विशाखा, नंदिनी, सुशीला, भाऊ किशोर तेलतुंबडे, विलास तेलतुंबडे यांच्यासह २०० पेक्षा अधिक नातलग उपस्थित होते. यावेळी मिलिंद तेलतुंबडे याच्या चितेला पत्नी अंजला व पुतण्या ॲड.विप्लव तेलतुंबडे यांनी अग्नी दिला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी