शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तणावपूर्ण वातावरणात प्रवीण दिवटेवर अंत्यसंस्कार

By admin | Published: August 29, 2016 12:48 AM

येथील काँग्रेसचा माजी नगरसेवक तथा कुख्यात प्रवीण दिवटे याच्या पार्थिवावर रविवारी सकाळी तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हजारोंंचा जनसमूदाय : शहरातील बाजारपेठ बंद यवतमाळ : येथील काँग्रेसचा माजी नगरसेवक तथा कुख्यात प्रवीण दिवटे याच्या पार्थिवावर रविवारी सकाळी तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत हजारोंंचा जनसमूदाय सहभागी झाला होता. अंत्ययात्रेदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच भाजी मंडीसह बाजारपेठ दुपारपर्यंत बंद होता. प्रवीण दत्तूजी दिवटे (४३) याचा गोळ्या झाडून आणि तलवारीचे घाव घालून शनिवारी सकाळी निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. रविवारी सकाळी ११ वाजता वाघापूर रोडवरील त्याच्या राहत्या घरुन अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत यवतमाळ शहरासह विदर्भातील त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. शहरातील स्टेट बँक चौक, पोस्ट आॅफीस, हनुमान आखाडा, नगर परिषद, शनि मंदिर चौक मार्गे अंत्ययात्रा पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात पोहोचली. अंत्ययात्रा मार्गावरुन जात होती, त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फाही नागरिकांनी गर्दी केली होती. अंत्ययात्रेच्या मार्गात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.काही काळासाठी या मार्गावरील वाहतूकही रोखण्यात आली. मोक्षधामात पाय ठेवायलाही जागा नव्हती. प्रवीण दिवटे याच्या पार्थिवाला त्याच्या दोन मुलींनी भडाग्नी दिला. याठिकाणी अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.प्रवीण दिवटेची निर्घृण हत्या झाल्याचे शनिवारी माहीत होताच संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता. दरम्यान रविवारीही शहरात तणावसदृश वातावरण होते. येथील विठ्ठलवाडी परिसरातील भाजीमंडीत रविवार असतानाही भाजीपाल्यांचा लिलाव झाला नाही. तसेच अंत्ययात्रेच्या मार्गावरील व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. (कार्यालय प्रतिनिधी) तपासासाठी तीन पथके खुनाच्या घटनेनंतर आरोपींना तत्काळ अटक व्हावी या उद्देशाने तीन तपास पथकांचे गठण करण्यात आले. टोळी विरोधी पथकातील विभाजन करुन दोन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक अशा तीन पथकावर यातील आरोपींना अटक करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. खुनातील आरोपी घटनेनंतर पांढरकवडा मार्गावरील सोनखास येथून रविवारी सकाळी आॅटोरिक्षाने मेटीखेडापर्यंत पोहोचले आणि तेथून हे आरोपी पुढे पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. थोड्या फरकाने आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटल्याचेही सांगितले जाते. तपास शहरचे ठाणेदार नंदकुमार पंत यांच्याकडे देण्यात आला आहे.बंटी जयस्वालला तीन दिवसांची पोलीस कोठडीप्रवीण दिवटे खून प्रकरणात शनिवारी पोलिसांनी नगरपरिषदेचा स्वीकृत सदस्य बंटी उर्फ आनंद जयस्वाल याला ताब्यात घेतले होते. रविवारी त्याला न्यायालयापुढे हजर करून पोलिसांनी ३ सप्टेंबरपर्यंत कोठडी मागितली. यावर न्यायालयाने ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. याशिवाय विधीसंघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयापुढे हजर केले. त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. यावेळी आरोपीच्या बाजूने अ‍ॅड. सलीम शाह यांनी युक्तीवाद केला.