लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा संताप सोमवारी नागरिकांनी नळयोजनेची अंत्ययात्रा काढून व्यक्त केला. काही आंदोलकांनी मुंडण केले. महिला, पुरुषांनी अंत्ययात्रेत सहभाग नोंदवत तिरडीला खांदाही दिला.शहराचा पाणीप्रश्न मागील अनेक महिन्यांपासून गंभीर झाला आहे. नगरपंचायतीला तोंडी, लेखी सूचना करूनही दुर्लक्ष करण्यात आले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे यासाठी त्यांनाही साकडे घालण्यात आले. तरीही हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने कुणाकडून प्रयत्न झाले नाही. हातपंप, विहीरींनी तळ गाठला आहे. कळमनेर येथून पाणी ओढण्यासाठी पाईप लाइनकरीता पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. प्रत्येक दोन-चार दिवसात ही पाईप लाइन फुटते. दोन आठवड्यानंतर केव्हा तरी आलेल्या नळाचे पाणी केवळ अर्धा ते पाऊण तास येते.सोमवारी राळेगाव शहर पाणी टंचाईग्रस्त महिला समितीच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा नेण्यात आला. मुंडण करून पाणी पुरवठा योजनेची अंत्ययात्रा काढण्यात आली. वाºहा बायपास ते पाण्याच्या टाकीपर्यंतची पाइप लाईन सिमेंट रोडखाली दबली आहे. ही लाईन दुरुस्त करावी, निकृष्ट पाईप लाइनची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. सार्वजनिक विहीरी स्वच्छ करून वॉर्डा-वॉर्डात पाणी पुरवावे आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. घागरी फोडून नगरपंचायतच्या दुर्लक्षित कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला. अपक्ष नगरसेवक शशिकांत धुमाळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यापूर्वीही त्यांनी हा प्रश्न शासन दरबारी मांडला आहे.पाणी प्रश्नाला नगरपंचायत जबाबदारराळेगाव शहरातील पाणीप्रश्न नगरपंचायतीची अकार्यक्षमता, नियोजनशृून्यता यामुळे निर्माण झाली असल्याचे आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. सदर प्रश्न गंभीर होत असल्याचे निदर्शनास आल्याने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जीवन प्राधिकरण, बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांची तातडीची बैठक घेवून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बेंबळा प्रकल्पातील आरक्षित पाण्याची उचल, एक्स्प्रेस फिडरची नियमित वीज, पाण्याच्या उपशासाठी अतिरिक्त मोटारपंप, शहरातील पाणी वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावर तत्काळ कारवाईचे निर्देश उपविभागीय अधिकाºयांना दिले आहे, असे आमदार डॉ. प्रा.अशोक उईके म्हणाले.
राळेगाव शहरात नळाची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 9:47 PM
लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा संताप सोमवारी नागरिकांनी नळयोजनेची अंत्ययात्रा काढून व्यक्त केला. काही आंदोलकांनी ...
ठळक मुद्देकृत्रिम पाणीटंचाईवर आंदोलन : आंदोलकांनी केले मुंडण, एसडीओकडे दिली धडक