लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दरवर्षी नांदेड, किनवट, चंद्रपूर या भागातून कापूस वेचणी, सोयाबीन कापणीसाठी वणी उपविभागात येणाऱ्या मजुरांच्या टोळ्यांनी यावर्षी कोरोनामुळे पाठ फिरविली आहे. परिणामी शेतकऱ्यांपुढे मजुरांचा प्रश्न उभा ठाकला आहे. एकीकडे कापूस वेचणीवर येऊन असून दुसरीकडे परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.मजुरच सापडत नसल्याने कापूस वेचणी प्रभावित झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन कापणीअभावी शेतातच उभे असून पावसामुळे शेंगातील दाण्यांना अंकुर फुटत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे पीक मातीमोल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागीलवर्षीदेखिल या मोसमात पिकांना पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. यंदाही आता हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असतानाही शेतकºयांनी जिवाची पर्वा न करता शेतात पेरणी केली.या हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने पीक परिस्थितीतही चांगली होती. परंतु परतीचा पाऊस लांबला आणि ऐन सोयाबीन कापणी व कापूस वेचणीच्यावेळी परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून या भागात अधुनमधून पाऊस येत आहे. त्यामुळे कापूस ओला होत असून त्याचा दर्जा खालावत आहे.दरवर्षी कापूस वेचणी व सोयाबीन कापणीसाठी नांदेड, किनवट, चंद्रपूर जिल्ह्यातील मुल या भागातील शेकडो मजूर वणी उपविभागात येतात. एकाएका शेतकऱ्याकडे १५ ते २० मजुरांची टोळी सोयाबीन कापणी व कापूस वेचणीचे काम करते. यंदा मात्र परिस्थिती भीषण आहे.कापूस वेचणी व सोयाबीन कापणीसाठी एक-दोन बाहेरचे मजूर येत आहेत. त्यामुळे स्थानिक मजुरांनीही मजुरीचे दर दुपटीने वाढवून टाकले आहे. अनेक शेतकरी दुप्पट मजुरी द्यायला तयार असतानाही पाहिजे त्या संख्येत मजुरांची उपलब्धता होत नसल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.कापूस वेचाईचा भाव झाला दामदुप्पटमागीलवर्षी पाच रूपये प्रति किलो कापूस वेचाईचा दर होता. परंतु यंदा मजुरांच्या तुटवड्यामुळे स्थानिक मजुरांनी कापूस वेचाईचा भाव दामदुप्पट करून टाकला आहे. गरजवंत शेतकरी १० रूपये प्रति किलो दर देऊन आपल्या शेतातील कापसाची वेचाई करित आहेत.
परजिल्ह्यातील मजुरांच्या टोळ्यांनी फिरविली कापूस वेचणीकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 5:00 AM
मजुरच सापडत नसल्याने कापूस वेचणी प्रभावित झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन कापणीअभावी शेतातच उभे असून पावसामुळे शेंगातील दाण्यांना अंकुर फुटत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे पीक मातीमोल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागीलवर्षीदेखिल या मोसमात पिकांना पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. यंदाही आता हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देस्थानिक मजुरांचे भाव वाढले । पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर