रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसची सबसिडी सोडण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील एक लाख एक हजार ५०० ग्र्नाहकांनी आपली सबसिडी सोडली आहे. यात सर्वाधिक ग्राहक विदर्भातील आहे. मात्र सबसिडी सोडणाऱ्या ग्राहकांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.सिलिंडर गॅस वितरणाची संपूर्ण प्रक्रिया बदलविण्यात आली आहे. आता थेट ग्राहकाच्या बँक खात्यात सबसिडीचे पैसे जमा होतात. त्यामुळे गॅस वितरणात नियमितता आली असून काळाबाजार थांबविण्यात यश आले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमंत ग्राहकांनी गॅसची सबसिडी सोडावी, असे आवाहन केले. यातून गरजू ग्राहकांना गॅस उपलब्ध होईल, असा त्यामागचा उद्देश आहे. पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील एक लाख एक हजार ५०० ग्राहकांनी गॅसची सबसिडी परत केली आहे. पश्चिम महाराष्ट आणि मुंबईपेक्षा गॅसची सबसिडी सोडणाऱ्या ग्राहकांची संख्या विदर्भात सर्वाधिक आहे. गॅसची सबसिडी सोडल्याने केंद्र सरकारचे दरमहा अडीच कोटी रुपये वाचणार असून यातील ३० कोटी रुपये राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे.
मंत्री, आमदार, खासदारांची नावे गोपनीयगॅस एजंसीने सबसिडी सोडणाऱ्या ग्राहकांची संख्या जाहीर केली आहे. मात्र ही सबसिडी सोडणाऱ्या ग्राहकांची नावे मात्र गोपनीय ठेवली आहे. त्यामुळे कोणी सबसिडी सोडली याची माहिती मिळत नाही. यात मंत्री, आमदार, खासदार किती आहे हे कळायला मार्ग नाही.
यवतमाळात १९ हजार ग्राहकयवतमाळ जिल्ह्यातील १९ हजार ४७८ ग्राहकांनी गॅसची सबसिडी परत केली आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यातील हा सर्वात मोठा आकडा मानला जातो. सबसिडी सोडणाऱ्या काही ग्राहकांमध्ये चुकीने बटन दबल्यामुळे सबसिडीला मुकलेले ग्राहकही आहेत.