लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सात वर्षानंतर पहिल्यांदाच शासनाने शिक्षक भरतीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मे महिन्यात जिल््यातील सर्व रिक्त जागांच्या जाहिराती एकाच वेळी शासनाच्या पोर्टलवर टाकाव्या आणि सर्व जागा एकत्रितरीत्या भराव्या, अशी मागणी बेरोजगार डीएड, बीएडधारकांनी केली. याबाबत गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांना उमेदवारांनी निवेदन दिले.शासनाने शिक्षक भरतीकरिता डिसेंबरमध्ये अभियोग्यता चाचणी घेतली. जिल्ह्यातील हजारो तरुण-तरुणींनी ही परीक्षा दिली आहे. त्याचा निकालही लागला असून लवकरच पवित्र पोर्टलद्वारे पद भरती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, ही पदे विस्कळीतपणे जाहीर न करता, एकत्रच जाहीर केली जावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.यवतमाळ जिल्ह्यात अनेक शाळा एक शिक्षकी आहेत. तर अनेक शाळेत पटसंख्येच्या प्रमाणात पुरेसे शिक्षक नाहीत. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. २०१० नंतर राज्यात शिक्षक भरती झालेली नाही. त्यातूनच जिल्ह्यात गेल्या सात-आठ वर्षांपासून अनेक जागा रिक्त आहेत. आता जागा भरण्यासाठी शासनाचे पवित्र पोर्टल सुरू होणार आहे. त्यावर २५ मे ते ३० मे या कालावधीत जिल्ह्यातील सर्व रिक्त जागांची जाहिरात टाकावी, अशी मागणी बेरोजगारांनी केली आहे.निवेदन देतेवेळी धनंजय विठोले, अभय राऊत, प्रितम मेंढे, प्रवीण रंगारी, भूषण धोपटे, गजानन चव्हाण, अविनाश दीडशे, राहुल वटाणे, नीलेश ठाकरे, गणेश पोलचेट्टीवार, निखिल पवार, प्रदीप पवार, योगेश वाढई, नानकसिंग साबळे, पंकज पवार आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या रिक्त जागा एकत्रित भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:27 PM
सात वर्षानंतर पहिल्यांदाच शासनाने शिक्षक भरतीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मे महिन्यात जिल््यातील सर्व रिक्त जागांच्या जाहिराती एकाच वेळी शासनाच्या पोर्टलवर टाकाव्या आणि सर्व जागा एकत्रितरीत्या भराव्या, अशी मागणी बेरोजगार डीएड, बीएडधारकांनी केली.
ठळक मुद्देबेरोजगारांची मागणी : पवित्र पोर्टलवर एकाच वेळी सर्व जाहिराती टाका