लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित ‘स्टार्टअप इंडिया - २०१८’ या स्पर्धेत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.प्रोजेक्ट मॉडेल्सचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल हे विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी ठरले. नितेश धैर्या आणि स्वप्नजा राऊत यांनी ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट आॅफ सोलर सिल्क रिलिंग मशीन’ हा प्रोजेक्ट या परिषदेत सादर केला होता. त्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. देशभरातील नामांकित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा या परिषदेत सहभाग होता.सोलर सिल्क रिलिंग मशीन या उपकरणाद्वारे सौर ऊर्जेतून रेशीमधागा तयार करता येतो. शेतीपुरक व्यवसाय म्हणून उपयोगात आणला जाऊ शकतो. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हे उपकरण वरदान ठरणारे आहे, असे मत विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक प्रा. संदीप सोनी यांनी व्यक्त केले.
‘जेडीआयईटी’तील विद्यार्थ्यांचा ‘स्टार्टअप इंडिया-२०१८’ स्पर्धेत गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 11:55 PM