लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : मुख्यमंत्र्यांना शेतकरी हिताचे धोरण आखता यावे म्हणून जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यांना अभ्यासासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्याचा आसूड’ हे पुस्तक टपालाने पाठविले.महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकातून तत्कालीन इंग्रज राजवटीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तविकता विषद केली आहे. सध्या राज्यातील शेतकऱ्यांना त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आधीच शेतकाऱ्यांना नैसर्गिक, तांत्रिक, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात भर म्हणजे तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आला. तसेच भारनियमन व रब्बी पिकांसाठी अद्याप प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले नाही. या परिस्थितीला शेतकºयाना सामोरे जावे लागत असताना सरकार निद्रीस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विदारक समस्यांची जाणीव मुख्यमंत्री म्हणून तरी त्यांना व्हावी, यासाठी त्यांनी हे पुस्तक अभ्यासून तरी शेतकरी हिताचे धोरण आखावे, अशी विनंती काँग्रेसतर्फे करण्यात आली.पुस्तक पाठविताना तालुक्यातील शेतकऱ्यांसह जितेंद्र मोघे, तालुकाध्यक्ष डॉ.विजय कडू, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव मेश्राम, माजी नगराध्यक्ष जगदीश पंजाबी, किशोर दावडा, सुभाष गोडे, सुरेश कुडगावे, कानींदे पाटील, राजू निकोडे, राजू मुनेश्वर, विनोद मुनगिनवार, मोहन भोयर, शंकर महाराज, मनोज मेश्राम, अमृत पेंदोर, विजय परचाके,अतुल राठोड, सागर डंभारे, सुनील हूड, असलम कुरेशी, शोभा ठाकरे, विद्या सलाम, श्याम नागरिकर, अनिल बावणे, दिलीप राठोड, मुजामिल पटेल, सुशील मेश्राम, फैयाज मुसानी, दिलीप राठोड, दिनेश ठाकरे, पुंडलिक मडावी, शांती उईके, अश्विनी राऊत, शीतल मराठे, सुचिता पठाडे, रुबिना शेख, वर्षा अक्कलवार, मीना डंभारे, हसीना शेख, संगीता तलांडेसह शहर व तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, युवती काँग्रेस, एनएसयूआय, विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
घाटंजी काँग्रेसतर्फे ‘सीएम’ना पुस्तक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:36 PM