शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

वाहतूक कोंडीतून सुटका करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:23 AM

शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढून शहरवासीयांना दिलासा द्यावा, .......

ठळक मुद्देप्रतिसाद फाऊंडेशन : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढून शहरवासीयांना दिलासा द्यावा, यासाठी प्रतिसाद फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून काही उपायही यात सुचविण्यात आले आहे.बसस्थानक चौकात पोलीस चौकी एका कडेला आहे. वाहतूक व्यवस्था चौकीत बसून हाताळली जाते. तांत्रिकदृष्ट्या दारव्हा व आर्णी रस्ता या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. वाहतूक पोलीस हजर राहिल्यास अपघात टाळले जाऊ शकतात. दारव्हा मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सची सतत ये-जा सुरू असते. ट्रॅव्हल्सचे चालक सिग्नल ओलांडेपावेतो धावत्या गाडीतूनच प्रवासी भरत नेतात. त्यामुळेही अपघात होतात. याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.आर्णी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही खासगी बसेस एकेरी मार्गातून वाहन टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. या वाहनांचा मार्ग बायपासवरून केल्यास वाहतुकीची कोंडी होणार नाही. शहराबाहेरून वळण रस्त्याची सोय आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळात जड वाहतूक थांबविल्यास अपघात टळू शकतात. बसस्थानक चौकातील सिग्नलचे टाईमर केवळ २२ सेकंद आहे. प्रत्येकजण आपले वाहन समोर काढण्याचे प्रमाण वाढले आहे. सिग्नलचे टाईमर वाढविले जावे.अनधिकृत पार्किंगच्या नावाखाली वाहन टोर्इंग करून नेले जाते. कायद्याप्रमाणे सूचना केल्यानंतरच वाहन टोर्इंग केले जावे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना आखल्यास वाहतुकीच्या कोंडीतून शहरवासीयांची सुटका होऊ शकते, असे यावेळी सुचविण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी या समस्येवर आठ-पंधरा दिवसात तोडगा काढला जाईल, असे सांगितले. यावेळी प्रतिसाद फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाने, प्रलय टिप्रमवार, विनोद नराये, अजय बोरेले, रवी माहुरकर, विनोद दोंदल, सचिन कावरे, राजेश इसाळकर, अनिल तांबेकर, गजानन राऊत, किशोर गावंडे, प्रकाश लांजेवार, शशी राय, शंकी यादव, शुभम संगीतराव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी