शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

कामावर जायचे की पाणी भरायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:47 PM

हातपंपाचा परिसर म्हणून वंजारी फैलातील वसाहतीचा काही भाग ओळखला जातो. या हातपंपांना सध्या पाण्याचा थेंबही नाही. मात्र तुमच्या भागात हातपंप आहे.

ठळक मुद्देहातपंपाचा परिसर म्हणून टँकर येईना, सार्वजनिक टाकी मातीने भरली

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हातपंपाचा परिसर म्हणून वंजारी फैलातील वसाहतीचा काही भाग ओळखला जातो. या हातपंपांना सध्या पाण्याचा थेंबही नाही. मात्र तुमच्या भागात हातपंप आहे. मग तुम्हाला टँकरची आवश्यकता काय आहे? असे म्हणून या भागात टँकरच पाठविला जात नाही. आता आम्ही दिवसभर काम करायचे की पाण्यासाठी गावभर फिरायचे? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.आयुष्याची ६५ वर्षे झाली. पण असा दुष्काळ आम्ही पाहिला नाही. याच्या आधीही टंचाई आली. पण जीनातली विहीर, नाल्याकाठची विहीर यातून पाणी भरले. नळ आले अन् सारं चित्र बदलले. आता विहिरीत गाळ साचला आहे, असे मालती मार्इंदे म्हणाल्या.या भागात सर्वसामान्य, रोजमजुरी करणारे लोक राहतात. आठ ते १० दिवसापूर्वी टँकर आला. आता येतच नाही. रस्त्यावर टाक्या लावायला सांगितले. काहींना पाणी भेटले. काहींना नाही, असे सुषमा माडकुटे, नंदा राऊत, सुशिला ठाकरे, छाया डुमरे, सुनंदा शेंडे म्हणाल्या.नळाचे पाणी २१ दिवसांपूर्वी आले. त्या पाण्यात प्रचंड गाळ होता. पाणी पिवळं होतं. पाण्याला वास होता. आता पिण्याचे पाणी म्हणून जपून ठेवले. त्या पाण्यावर सारखी तुरटी फिरवली. जीवन ड्रॉप टाकला. भांड्यात खाली गाळच आहे. तसेच पाणी प्याव लागते. या पाण्यात भागत नाही. म्हणून साईनगर, पिंपळगाव, आदर्शनगर, पतंगे ले-आऊट या सारख्या भागातून पाणी आणावे लागते. अख्खी वस्ती रात्रभर पाण्यासाठी जागते. रोजमजुरी सोडून पाण्यासाठी थांबावे लागते. असे जया बगमारे, शिताबाई ठेंगरे, माया ठेंगरे, पुष्पा ठेंगरे, म्हणाल्या.काही भागात २४ तास नळ असते. आम्हाला पाणी नाही. या भागात पाणी वाटपासाठी टाकी बांधण्यात आली. दुष्काळात या टाकीत पाणी टाकले जात होते. तेथूनच पाणी नेल्या जायचे. आता या टाक्यात माती भरून आहे. यामुळे इतक्या मोठ्या टाक्याचा कुठलाच उपयोग होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सर्वसामान्यासाठी अतिरिक्त टँकर देण्यात यावे, शुध्द पाणी द्यावे असे मत नितीन माटे यांनी व्यक्त केले.गल्लीत टँकर जात नाही म्हणून आम्हाला रस्त्याच्या दोनही भागाकडच्या महिला पाणी भरण्यासाठी एन्ट्री देत नाही. आम्हाला पाणीच भेटले नाही, असे भागिरथाबाई मेश्राम, गिरजा शेळके, सरस्वती मेश्राम, सुशिला ठेंगरे म्हणाल्या.आमच्या भागात सरकारी स्टँडपोज होता. दुष्काळामुळे तो उपटून टाकला आता पाणी भरायला स्टँडपोजही नाही. हातपंप बंद पडला. दुरूस्ती झाली नाही, असे जोसना ठेंगरे, रेखा ठेंगरे, मिना नागमोते, वेणू मरगडे, मंगला ठाकरे, पुष्पा शेंडे म्हणाल्या. या भागात भांडणे करणाऱ्या लोकांनाच जास्त पाणी मिळते, असा आरोपही यावेळी काही महिलांनी केला.१०० रूपयात तीन ड्रमया भागात पाण्यासाठी दुसºया भागाकडे धाव घ्यावी लागते. काही खासगी बोअरधारक १०० रूपयाला तीन ड्रम पाणी विकतात. एका ड्रमला पाणी आणण्याचे ३० रूपये भाडे वेगळे द्यावे लागते.हापशी गाळाने भरलीकालीमाता मंदिराजवळील हापसीने या भागात आजपर्यंत पाणी प्रश्न सोडविला. ही हापसी आतून गाळल्या गेली आहे. त्याला क्रशिंग केले तर चांगले पाणी लागते.नाल्याच्या विहिरीत गाळनाल्याकाठच्या विहिरीत प्रचंड पाणी आहे. पण त्यात गाळ मोठ्या प्रमाणात आहे. हा गाळ उपसला तर या भागात पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्याची खबरदारी घेण्याची गरज आहे.उलट्या आणि हगवणयाच भागातील काही ठिकाणी टँकरच्या पाणी पुरवठ्यातून जलजन्य आजार उद्भवल्याची माहिती नंदा चव्हाण, लिना सोनी, शोभा बिडवे, आशा जायभाये यांनी दिली. पाण्यामुळे अंगावर खाज येत आहे. लहान मुलांना हगणवण, उलट्या होत असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Waterपाणी