शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

घारफळचे आरोग्य केंद्र डॉक्टरविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 9:51 PM

ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ आणि योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र घारफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याला अपवाद ठरत असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय या केंद्राचा कारभार सुरू आहे. अनेकदा नागरिकांना उपचाराशिवाय परत जावे लागते. या केंद्रांतर्गत येणाºया उपकेंद्राची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.

ठळक मुद्देनागरिकांना मनस्ताप : उपकेंद्रातील कारभारही रामभरोसे, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती

संजय राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कघारफळ : ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ आणि योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र घारफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याला अपवाद ठरत असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय या केंद्राचा कारभार सुरू आहे. अनेकदा नागरिकांना उपचाराशिवाय परत जावे लागते. या केंद्रांतर्गत येणाºया उपकेंद्राची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.पावसामुळे जलजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी लोकांना गावात असलेल्या आरोग्य केंद्राचाच आधार असतो. येथे असलेल्या आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाºयांची दोन पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात एकाच वैद्यकीय अधिकाºयावर दिवस ढकलले जात आहे. आता तर वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर अर्के यांची बदली झाली. त्यामुळे वैद्यकीय अधिकाºयांशिवाय काम सुरू आहे. अमरावती येथील एका अधिकाºयाला याठिकाणी नियुक्ती देण्यात आली. त्यांनीही बदली रद्द करून घेतली.या आरोग्य केंद्रांतर्गत घारफळ, पाचखेड, सरूळ, वाटखेड(बु) हे उपकेंद्र येतात. वैद्यकीय अधिकारीच नसल्याने सदर उपकेंद्राचे कर्मचारी उपस्थित राहात नाही. त्यामुळे हे उपकेंद्र नामधारी ठरले आहे. पहूर येथील वैद्यकीय अधिकाºयाची याठिकाणी तात्पुरती नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. अद्याप तरी ते रूजू झालेले नाही. परिसरातील परसोडी, सरूळ, सारफळ, गवंडी, खर्डा, एरंडगाव, गोंधळी, वडगाव, सिंदी, वरूड, रेणुकापूर, आष्टा रामपूर, बोरवघळ आदी गावातील नागरिकांना आता उपचारासाठी तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत आहे.प्रहार संघटनेचे आरोग्य विभागाला निवेदनघारफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराविषयी प्रहार संघटनेने आरोग्य विभागाला निवेदन दिले. गुरुवारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी तेथे केवळ दोन कर्मचारी हजर होते. रुग्णालय आणि परिसरात प्रचंड अस्वच्छता होती. सदर आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी द्यावा, कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी बाभूळगाव तालुका अध्यक्ष अतुल राऊत, उपाध्यक्ष शेख जावेद, आकाश राऊत, गणेश झुंबड, स्वप्नील वाघ, विश्वास लसवंते, मुकेश इंगळे, आकाश गायकवाड आदी उपस्थित होते.