कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नामदेव ससाने होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती सविता कदम, पंचायत समिती सदस्य धनराज तगरे, लक्ष्मीकांत नंदनवार, अमोल व्हटगीरे, गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखेडे, सहायक बीडीओ अमोल चव्हाण उपस्थित होते. यावेळी २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या काळात घरकूल पूर्णत्वास नेणाऱ्या तालुक्यातील दराटी, टाकळी (इ), सावळेश्वर या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिव व लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नागापूर (प), झाडगाव, अंबाळी, अकोली, नागापूर (रू), धानोरा (सा) येथील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तालुक्यात योजनेंतर्गत ६२९ घरकुलांचे वाटप करण्यात आले. पुढील काळात तालुक्याला ४५ हजार घरकूल मिळणार आहे, असे आमदार नामदेव ससाने यांनी सांगितले. राज्यात तालुक्याचा घरकूल योजनेंतर्गत पहिला क्रमांक यावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे बीडीओ प्रवीणकुमार वानखेडे यांनी स्पष्ट केले. संचालन विस्तार अधिकारी अरुण सोनटक्के यांनी केले.