शिक्षक समिती : पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार घाटंजी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने स्थानिक शेतकरी भवन येथे ज्ञानरचनावादी शैक्षणिक परिषद पार पडली. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या शैक्षणिक परिषदेत सातारा येथील एज्युकेशन फाऊंडेशनचे राजेश चव्हाण यांनी शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस गजानन देऊळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी मनूताई पखाले, पप्पू भोयर, मोहन जाधव, किशोर सरोदे, विलास गुल्हाने उपस्थित होते. चर्चासत्रात जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, पप्पू पाटील भोयर, एस.पी.लाकडे, विजय चौधरी यांनी भाग घेतला. घाटंजी पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती कालिंदा आत्राम, जिल्हा परिषद सदस्य आशीष लोणकर, सरिता जाधव, पंचायत समिती उपसभापती निता जाधव, पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे, नयना मुद्देलवार, मुकेश भोयर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षकांचा व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रमोद ठाकरे, अशोक सिंगेवार यांनी यावेळी समितीमध्ये प्रवेश घेतला. प्रास्ताविक नारायण भोयर यांनी केले. संचालन संतोष कर्णेवार तर आभार राजेंद्र गोबाडे यांनी मानले. यशस्वितेसाठी शाखाध्यक्ष रवींद्र उमाटे, सचिव विशाल साबापुरे, प्रशांत गवळी, प्रफुल्ल चौधरी, के. डी. मडावी, रमेश कनाके, रमेश डोहळे, सुधाकर भोयर, सुनिल ईमडे, पारखे, मोहन ढवळे, अजय महाजन, विलास डोमाळे, वसंत इंगोले, अशोक मोहुर्ले आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
घाटंजीत ज्ञानरचनावादी शैक्षणिक परिषद
By admin | Published: April 23, 2017 2:32 AM