घाटंजी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ माध्यमिक कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी या शैक्षणिक सत्रात शालेय अभ्यासक्रम, विविध स्पर्धा परीक्षा, दहावीच्या परीक्षेत भरीव यश संपादन करत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे विज्ञान व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. विज्ञान व क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर शाळेच्या दहा विद्यार्थिनी सहभागी झाल्या. मृणाल विशाल भोयर हिने राष्ट्रीयस्तरावर नाव उंचावले. तिने भारतीय आंतरराष्ट्रीय जत्रा-२०१६ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ती दोनवेळा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाली आहे. ४२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक आणि माध्यमिक या दोनही गटात प्राजक्ता गजानन निकम व नेहा पांडुरंग निकोडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. क्रीडा स्पर्धेत १९ वर्षाखालील राज्यस्तरीय ड्रॉप रो-बॉल स्पर्धेत ट्रिपल मुली या गटात या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. १४ वर्षाखालील राज्यस्तरीय ड्रॉप रो-बॉल स्पर्धेत ऋतुजा राजू अणेवार, प्राजक्ता गजानन निकम, वेदिका प्रवीण ठाकरे, मनस्वी शांताराम सुरस्कार, वेदांती आकाश नगराळे, श्रावणी गजानन इंगोले, मेघा राजेश राजकुंडवार या विद्यार्थिनींनी सिंगल, डबल, ट्रिपल या गटात राज्यात प्रथम स्थान प्राप्त केले. विज्ञान व क्रीडा क्षेत्रातील भरघोस यशाकरिता अतुल सुरेशराव ठाकरे, अर्चना नारायण केकापुरे, विवेक ढोके, मुख्याध्यापिका पी.एस. गावंडे, पर्यवेक्षक एस.सी. राठोड आदींचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या या यशाबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शकांचे संस्थेचे अध्यक्ष एस.ए. गिलाणी, उपाध्यक्ष ए.एस. गिलाणी, सचिव अॅड. अनिरूद्ध लोणकर, संचालक आर.यू. गिरी, संचालिका आलिया ए. शहजाद, गिलाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शहजाद, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका पी.एस. गावंडे, पर्यवेक्षक एस.जी. राठोड आदींनी कौतुक केले. (तालुका प्रतिनिधी)
घाटंजीतील विद्यार्थिनींची भरारी
By admin | Published: April 01, 2017 12:38 AM