शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

संशयाचे भूत शिरले, वनरक्षक पत्नीला पतीने ठार केले

By admin | Published: January 22, 2017 12:11 AM

तो औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीला अन् ती नर्स म्हणून खासगी रुग्णालयात कामाला. दोघेही दुरचे नातेवाईक़ यातून दोघांमध्ये प्रेम जुळले.

तो औरंगाबाद येथे खासगी कंपनीत नोकरीला अन् ती नर्स म्हणून खासगी रुग्णालयात कामाला. दोघेही दुरचे नातेवाईक़ यातून दोघांमध्ये प्रेम जुळले. कुटुंबीयांनीही याला फारसा विरोध न करता दोघांचेही लग्न लावून दिले. औरंगाबादमध्ये भाड्याच्या घरातच राजाराणीचा संसार सुरू झाला. आणखी सुख मिळावे यासाठी पतीने पत्नीला स्पर्धात्मक परीक्षेसाठी प्रोत्साहित केले. त्याच्या पाठबळामुळेच तिला तब्बल नऊ वर्षांनंतर वनरक्षक म्हणून वनखात्यात नोकरी मिळाली. सुदैवाने पतीच्या गावाजवळच यवतमाळ तालुक्यात पोस्टींगही मिळाली. अन् इथेच माशी शिंकली. त्याच्या डोक्यात संशयाचे भूत घोंगावू लागले. जाच वाढल्याने तिला मुलींच्या वसतिगृहात आश्रय घ्यावा लागला. उदात्त हेतूने चूल आणि मूल या चौकटीबाहेर पत्नीला काढण्यासाठी पतीची धडपड. त्याने तिला घरकामात मदत करून अभ्यासासह करिअर घडविण्यासाठी दिलेला वेळ. त्यासाठी केलेलं प्लानिंग अन् नंतर त्याचं आणि तिचं स्वप्न पूर्ण झाल्याने त्या दोघात निर्माण झालेला दुरावा. तिनं घराबाहेर पडावं, स्वत:ची ओळख निर्माण करावी यासाठी प्रोत्साहन देणारा तिचा पतीच छोट्या-छोट्या कारणावरून तिच्यावर संशय घ्यायला लागतो. या संशयाचं भूत इतकं बळावतं की तिला त्याच्यापासून दूर राहण्याशिवाय पर्यायच उरत नाही. अगदी ‘यशवंत’ या हिंदी चित्रपटातील कथानकासारखी घटना यवतमाळ लगतच्या जांब येथे घडली. यात पती हा बेरोजगार होता, तर पत्नी शासकीय नोकरीत होती. पूनम रणजित भाटी (२७) असे पतीच्या संशयाची बळी ठरलेल्या विवाहितेचे नाव आहे. पूनम आणि तिचा पती रणजित हे दोघेही विवाहापूर्वी औरंगाबाद येथे राहात होते. या दोघांमध्ये दूरचे नातेसंबंध असल्याचे त्यांच्या २००६ पूर्वी झालेल्या भेटीत उघड झाले. रणजित हा नायलॉन कंपनीत कामाला होता, तर पूनम शिक्षणासोबतच एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करायची. येथेच अपघाताने रणजित व पूनमची भेट झाली. नंतर त्या भेटी वाढत गेल्या. दोघांमध्ये परस्परांविषयी ओढ निर्माण झाली. पूनमच्या लग्नाची चर्चा कुटुंबीयांनी केली तेव्हा तिने आपला जोडीदार निवडल्याचे सांगितले. या प्रेमविवाहाला कुटुंबीयांनीही संमती दिली. २००६ मध्ये नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रूद्रापूर येथे धुमधडाक्यात दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर दोघेही औरंगाबादमध्येच स्थायिक झाले. विवाहानंतरही पूनमने आपला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. यासाठी रणजितनेही तिला वेळोवेळी हवी ती मदत केली. पूनमच्या परिश्रमाला यश आले. २०१५ मध्ये ती वनविभागात वनरक्षक म्हणून रुजू झाली. वनरक्षक हा फिल्डवरचा जॉब असल्याने तिला घरी येण्या-जाण्याची बंधने पाळता येऊ लागली नाही. ती यवतमाळ तालुक्यातील येळाबारा वनक्षेत्रात रुजू झाली. नंतर ती १ आॅक्टोबर २०१६ पर्यंत प्रशिक्षणासाठी निघून गेली. दरम्यानच्या काळात रणजित हा औरंगाबाद येथील नोकरी सोडून मूळ गावी जांब येथे परत आला. आता तो केवळ पूनमच्या पगाराचा फडशा पाडणे एवढेच काम करत होता. यातूनच त्यांच्यात वाद होत होते. रणजितला वाटायचे पूनम आपल्याला टाळते, तर वारंवार रणजितकडून केली जाणारी चौकशी पूनमलाही जाचक वाटायला लागली. यातूनच खटके उडू लागले. कामाच्या ठिकाणी सातत्याने फोन करून रणजित तिला त्रस्त करू लागला. प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर पूनमने पती रणजितच्या घरी राहण्याऐवजी मुलींच्या वसतिगृहात स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र तिला रणजितच्या वागण्यात बदल होईल अशी अपेक्षा होती. अनेकदा ती रणजितविरोधात तक्रारीसाठी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. मात्र तिने शेवटी निर्णय फिरविला व तक्रार दाखल केली नाही. सोमवारी सकाळी रणजित पूनमला घेण्यासाठी खासगी वसतिगृहात आला. त्याने पूनमला दुचाकीवर बसवून स्वत:च्या खरोली शिवारातील शेतात आणले. अन् तिथे पूनमशी वाद घालून तिच्यावर लाकडी दांडा, दगडाने हल्ला केला. यात पूनम जागेवरच गतप्राण झाली. घटनेची माहिती मिळताच रणजितचा भाऊ मनोज भाटी याने ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच रणजितला ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक समाधान धनरे करीत आहेत. जीवापाड जपणाऱ्या पत्नीवरच बेरोजगार रणजित संशय घेऊ लागला. तिची बदललेली दिनचर्या, कामाची पद्धत हे समजून घेण्याचा प्रयत्नच त्याने केला नाही. यातूनच त्याच्यावर तुरूंगात जाण्याची वेळ ओढवली, तर जिच्यासाठी त्याने कष्ट वेचले ती पत्नीच रणजितच्या वृत्तीने संशयाचा बळी ठरली.