शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

भीमसैनिकांचा भीमरायाला मानाचा मुजरा

By admin | Published: April 15, 2017 12:17 AM

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती पुसद शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली.

 ठिकठिकाणी डॉ. आंबेडकर जयंती उत्सव : पुसदमध्ये अभिवादन व भव्य मोटरसायकल रॅली पुसद : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती पुसद शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. हातात निळे आणि पंचशील झेंडे घेतलेले तरुण सर्वांचे लक्ष वेधत होते. भव्य मोटरसायकल व अभिवादन रॅलीने पुसदकरांचे लक्ष वेधले. स्थानिक महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने येथील डॉ.आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शुक्रवारी सकाळी ८ वाजता अभिवादन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष मिलिंद हट्टेकर, माजी अध्यक्ष महेश खडसे, भीमराव कांबळे आदींच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. सुधाकर बनसोड व तुकाराम चवरे यांनी सामूहिक बुद्धवंदना सादर केली. त्यानंतर नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ.अकील मेमन, अ‍ॅड.आप्पाराव मैंद, वसंतराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष विश्वास भवरे, शहराध्यक्ष भारत पाटील, शिवसेना तालुका प्रमुख विकास जामकर, बंडोपंत राऊत, भवरसिंह सिसोदिया, अनिल चेंडकाळे, ताहेर खान पठाण, डॉ.राजेश वाढवे, अर्जूनराव लोखंडे, काशीनाथ मुनेश्वर, नारायण पुलाते, सोमेश्वर जाधव, प्रा.शंकर चव्हाण, प्रा.विलास भवरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. सकाळी ९ वाजता पुसद शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीला जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, मिलिंद हट्टेकर, महेश खडसे, बंडोपंत राऊत, राहुल कांबळे यांच्या हस्ते झेंडी दाखविण्यात आली. यानंतर मोटरसायकल रॅली मुखरे चौक, नाईक चौक, महात्मा फुले चौक, कारला रोड, श्रीरामपूर बुद्ध विहार, बसस्थानकासमोरून छत्रपती शिवाजी चौक, सुभाष चौक, कापड लाईन, नगिना चौक, गांधी चौक, लक्ष्मीनगर मार्गे डॉ.आंबेडकर चौकात पोहोचली. रॅलीत देण्यात आलेल्या गगनभेदी घोषणांनी पुसद दुमदुमून गेले. दुपारी ३ वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन रॅलीला सुरुवात झाली. शहरातील विविध वॉर्डांतून रॅली येथे एकत्र आल्या आणि तेथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांचे मोठ्ठाले तैलचित्र लक्ष वेधून घेत होते. तर डिजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी भीमसैनिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. उपविभागीय अधिकारी अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वाघू खिल्लारे, ठाणेदार प्रकाश शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी) महागाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात महागाव : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती महागाव शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महागाव येथील बौद्ध विहारात सकाळी ९ वाजता पंचशील ध्वजारोहण आणि सामूहिक त्रिशरण पंचशीला घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सुनील नरवाडे, रामराव नरवाडे उपस्थित होते. येथील बसस्थानक परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी नांदेडचे प्रा.कैलास राठोड, डॉ.विश्वनाथ विणकरे, प्रा.शरद डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्ष सुनील नरवाडे, नगरपंचायतीचे उपाध्यक्ष उदय नरवाडे, बांधकाम सभापती राजू राठोड, माणिक मुनेश्वर, नगरसेवक नारायण शिरबिरे, जयश्री नरवाडे, मंदा महाजन, अजय कदम, शैलेश कोपरकर, विनोद कोपरकर, अरुणा चावरे, रामराव नरवाडे, महेंद्र कावळे, गजानन नांदेडकर, बाळू पाटील, धम्मानंद कावळे, संजय भगत, अमोल राजवाडे, गजानन वाघमारे, नाना ठाकरे, किसन पाईकराव, विश्वनाथ महामुने, गजानन साबळे आदी उपस्थित होते. काळी दौ. येथे सरपंच गौतम रणवीर, माजी सरपंच हाजी अब्दुल वहाब, संदेश रणवीर यांनी बाबासाहेबांना अभिवदन केले. तहसील कार्यालयात तहसीलदार नारायण इसाळकर यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. कळसा-चिंचोली येथे बाबासाहेबांना आगळे-वेगळे अभिवादन दिग्रस : येथील दारव्हा मार्गावरील रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली आणि अपघातास आमंत्रण देणारी गिट्टीची साफसफाई करून कळसा-चिंचोली ग्रामपंचायतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कृतीपूर्ण पद्धतीने अभिवादन केले. कार्यक्रमाला पुसद अर्बन बँकेचे संचालक सुधीर देशमुख, सरपंच मीनाक्षी देशमुख, कांता जयस्वाल, रश्मी जयस्वाल, तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किशोर कांबळे, रफीकभाई, अब्दुल रफीक, पोलीस पाटील अनिल देशमुख, राहुल देशमुख, बबलू जयस्वाल, अब्दुल वहीद, धरमनाथ शेगर, विकास कांबळे, सतीश जयस्वाल, नसरूद्दीन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)