ठळक मुद्देशेतकºयांना बोनस व हमीभावाने आधार मिळेल असा विश्वासफेडरेशनने खरेदी सुरू करावी अशी मागणीयवतमाळ विभागात समर्थन मूल्यावर कापूस खरेदी
आॅनलाईन लोकमतयवतमाळ: यावर्षी निवडणुकीच्या तोंडावर आपल्या राज्याच्या कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देत गुजरातच्या भाजप सरकारने ज्याप्रमाणे ५०० रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात हाच निर्णय घोषित करण्याचा आग्रह धरला आहे.५०० रुप. प्रति क्विंटल बोनस दिल्याने शेतकºयांना हमीभाव अधिक बोनस असा ४८५० रुपये प्रति क्विंटल असा मोठा आधार मिळू शकणार असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.मागील वर्षी विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकºयांनी सोयाबीन व तुरीचे विक्रमी उत्पादन केल्यानंतर व्यापाºयांनी भाव पाडल्याने हमीभावापेक्षा कमी भावात विकल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. यंदा ४० लाखाहून अधिक शेतकºयांनी सुमारे ५० लाखांहून अधिक हेक्टरमध्ये कापसाची पेरणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडक उन्हामुळे कापूस प्रचंड प्रमाणात फुटला असून पहिला वेचा सीतादेवी करून घरातसुद्धा आला आहे. मात्र सुरुवातीचा खरेदी भाव शेतकºयांच्या आशेवर पाणी फिरविणारा आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून सरासरी पाच हजार रुपये क्विंटल असणारा कापूस यावर्षी जागतिक मंदीच्या नावावर व्यापाºयांनी सरासरी चार हजार रुपये क्विंटल या भावात खरेदी करणे सुरू केल्याने राज्य सरकारने केंद्राच्या सीसीआय व फेडरेशनची कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी अशी मागणी तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
समर्थन मूल्य प्रति क्विंटल ४३२० रु.यवतमाळ, कळंब, पुसद, उमरखेड येथे समर्थन मूल्यावर कापूस खरेदीला बुधवारी प्रारंभ झाला. कापूस उत्पादक मार्केटिंग फेडरेशनचे संचालक सुरेश चिंचोळकर यांनी यवतमाळ येथील सागर जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी धामणगाव रोड येथे व पुसद येथे संचालक ययाती नाईक यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ केला. कापसाला समर्थन मूल्य प्रति क्विंटल ४३२० रु. एवढे देण्यात आल्याची माहिती फेडरेशनचे विभागीय संचालक चक्रधर गोसावी यांनी दिली आहे.