तहसीलदारांना निवेदन : घाटंजी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणीघाटंजी : तालुक्यातील शेतकऱ्यांचे सर्व पीककर्ज माफ करण्यात यावे व कापसाला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, अशी मागणी तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आली. या संबंधीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.तालुक्यात कापूस व सोयाबीनसारखी नगदी पिके यावर्षी कमी होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. बारमाही सिंचनासाठी निम्न प्रकल्पाचे काम सुरू करावे, कापसाला सात हजार रुपये व सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, सुरळीत वीजपुरवठा द्यावा, धडक सिंचन योजनेंतर्गत त्वरित विहिरी करून वीजपंपाची जोडणी द्यावी, सीसीआय व नाफेडमार्फत त्वरित खरेदी सुरू करावी, पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या प्रमाणे भाव द्यावा, जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे. तहसीलदारांना निवेदन देतेवेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रजय कडू, शहराध्यक्ष सुभाष गोडे, माजी पंचायत समिती सभापती रूपेश कल्यमवार, माजी उपसभापती सुवर्णा निकोडे, माजी नगराध्यक्ष जगदीश पंजाबी, माजी नगराध्यक्ष किशोर दावडा, इकलाक खान पटेल, संदीप बिबेकार, अॅड. विजय भुरे, जयप्रकाश काटपेल्लीवार, बाजार समितीचे संचालक रमेश आंबेपवार, डॉ.विजय कडू, अनंत ढगले, गौतम चौधरी यांच्या सह शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
कापसाला सात हजार रुपये भाव द्या
By admin | Published: October 17, 2015 12:42 AM