लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा सलग १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली.तालुक्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याच्या स्थितीत आहे. ज्या शेतकºयांकडे ओलिताची सोय आहे, त्यांना वेळेवर वीज उपलब्ध होत नाही. परिणामी त्यांना पिकांना पाणी देता येत नाही. तसेच सोयाबीनचे पीक करपले असून तत्काळ पंचनामे करावे, अशी मागणी निवेदनातून केली. गांभीर्याने विचार केला नाही, तर काँग्रेसने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, मनमोहनसिंग चव्हाण, रहमत पठाण, डॉ.दिलीप मिरासे, अशोक देशमुख, प्रकाश तरटे, राजू अवचट, शिवनारायण जयस्वाल, श्याम पाटील, महादेव उघडे, भगवंत कदम, रामराव राठोड, केशव कटके, रमेश गिरनालळे, रामहरी गावंडे, नेमीचंद पवार आदींच्या स्वाक्षºयाआहे.
शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:15 PM
शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा सलग १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली.
ठळक मुद्देकाँग्रेसची मागणी : एसडीओंना निवेदन