लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात ४ आणि ६ जून रोजी झालेल्या वादळाने अनेक गावातील घरे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.या गावात अनेक घरे जमीनदोस्त झाल्यामुळे येथील रहिवाशांचा अन्न, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना तातडीने मदत करण्याची मागणी आहे. अनेक घरावरील छप्परे उडून गेली. फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज पुरवठा बंद असल्यामुळे काही गावातील पाणी पुरवठा योजनेवर त्याचा परिणाम झाला आहे. वादळात निम्मे गाव उद्ध्वस्त झालेल्या लाखखिंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांनी भेट दिली. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.या सर्व बाबींचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत व सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी घुईखेडकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.चरण पवार, शहराध्यक्ष नासीर शेख उपस्थित होते.
दारव्हा तालुक्यातील वादळग्रस्तांना त्वरित मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:41 PM
तालुक्यात ४ आणि ६ जून रोजी झालेल्या वादळाने अनेक गावातील घरे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : लाखखिंडसह अनेक गावे उद्ध्वस्त, नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी