शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

गुणवंत शाळेला देणार १० लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:16 PM

नगरपालिकेची शाळा म्हणजे शिक्षणाच्या दुरवस्थेचा विद्रूप चेहराच, असा समज झाला आहे. मात्र यवतमाळ शहरातील शाळांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी नगरपालिकेने आगळेवेगळे पाऊल उचलले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणात सरस ठरणाऱ्या शाळेला १० लाखांचे घसघशीत बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपालिकेचा निर्णय : मूल्यांकनासाठी पाच सदस्यीय समिती गठित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपालिकेची शाळा म्हणजे शिक्षणाच्या दुरवस्थेचा विद्रूप चेहराच, असा समज झाला आहे. मात्र यवतमाळ शहरातील शाळांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी नगरपालिकेने आगळेवेगळे पाऊल उचलले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणात सरस ठरणाऱ्या शाळेला १० लाखांचे घसघशीत बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी याबाबत सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली. शहरातील एकूण तीन शाळांना बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यात पहिले बक्षीस १० लाखांचे, दुसरे ७ लाखांचे तर तिसरे बक्षीस ५ लाखांचे दिले जाणार आहे. यामुळे नगरपालिकेच्या शाळांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन गुणवत्ता वाढावी, असा उद्देश आहे. गुणवत्तेसाठी शाळांना तब्बल २२ लाखांचे पुरस्कार देणारी यवतमाळ ही राज्यातील पहिलीच नगरपालिका ठरणार आहे. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या संकल्पनेतून हा ‘गुणवत्तापूर्ण सर्वांग सुंदर शाळा’ उपक्रम पुढे आला, तर त्यासाठी प्रशासन अधिकारी योगेश डाफ यांनी पुढाकार घेतला.मात्र हे पुरस्कार पटकावण्यासाठी नगरपालिका शाळांना अनेक निकष पूर्ण करावे लागणार आहेत. गुरुवारी नगराध्यक्ष कांचन चौधरी, शिक्षण सभापती अ‍ॅड. करूणा तेलंग, मुख्याधिकारी अनिल अढागळे, प्रशासन अधिकारी योगेश डाफ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत निवड समिती गठित करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून पद्माकर मलकापुरे, सदस्य म्हणून अविनाश शिर्के, प्रशांत गावंडे, सुप्रभा यादगीरवार, उत्तमराव भोयर आदींचा समावेश आहे. ही समिती नगरपालिकेच्या शाळांना भेटी देऊन गुणवत्तापूर्ण सर्वांग सुंदर शाळा निवडणार आहे. या समितीला मुख्याध्यापकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSchoolशाळा