शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

सरकारी डॉक्टरांच्या सेवेने चार मुलींसह आईलाही जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 11:17 PM

चकाचक खासगी दवाखान्यांमध्ये सर्व सोई असल्या तरीही बहुतांश गर्भवतींना ‘सिझर’ करण्याचाच मार्ग दाखविला जातो. पण यवतमाळच्या सरकारी दवाखान्याने चक्क चार गर्भ असलेल्या महिलेची किचकट वाटणारी प्रसुतीही नैसर्गिकरीत्या घडवून आणली.

ठळक मुद्देमेडिकल कॉलेज : चार गर्भ असूनही नैसर्गिक प्रसुती, गरीब आईसाठी दीड महिना झटले डॉक्टर

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चकाचक खासगी दवाखान्यांमध्ये सर्व सोई असल्या तरीही बहुतांश गर्भवतींना ‘सिझर’ करण्याचाच मार्ग दाखविला जातो. पण यवतमाळच्या सरकारी दवाखान्याने चक्क चार गर्भ असलेल्या महिलेची किचकट वाटणारी प्रसुतीही नैसर्गिकरीत्या घडवून आणली. सरकारी दवाखान्यांविषयीचा न्यूनगंड पुसून टाकणारी ही यशकथा कशी घडली? मजूर महिलेची दीड महिना सेवा करणाऱ्या सरकारी डॉक्टरांनी हे शक्य केले. त्यांनी नेमकी कशी सेवा केली, कसे उपचार केले... वाचा त्यांच्याच शब्दात.‘एकाच वेळी चार मुलींना दिला जन्म’ या वृत्ताने गेल्या आठवड्यात अख्ख्या जिल्ह्याला आनंदित आणि चकितही केले होते. पहिली मुलगी असताना पुन्हा चार मुलींचे हसून स्वागत करणाºया या आईचे नाव आहे, राणी प्रमोद राठोड. दारव्हा तालुक्यातील चिखली रामनाथ येथील राठोड दाम्पत्य रोमजुरी करणारे. राणी गर्भवती असताना तिला त्रास जाणवू लागला. ती यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात (मेडिकल) आली, तेव्हाच डॉक्टरांनी ओळखले, राणीच्या पोटात चार गर्भ आहेत. पण तिला एकाएकी सांगण्यापेक्षा डॉक्टरांनी आधी तिच्यावर योग्य उपचार करण्याचा निर्णय घेतला. गर्भ सहा महिन्यांचे झाल्यावर राणीला चार गर्भ असल्याची कल्पना दिली.डॉक्टरांनी नेमके काय केले?आता ही प्रसुती यशस्वी करणे, हे डॉक्टरांसाठीही आव्हानच होते. प्रसुती विभाग प्रमुख डॉ. रोहिदास चव्हाण, डॉ. निमिषा शर्मा, डॉ. सुषमा गोरे, डॉ. पूनम कुलसंगे, डॉ. भव्या दोशी, डॉ. प्रक्षल शहा यांच्या चमूने ही जबाबदारी स्वीकारली. राणीला दवाखान्यात भरतीच करून घेण्यात आले. रात्रंदिवस या चमूने राणीची सुश्रृषा केली. उपचारासोबतच तिच्या आहाराची डॉक्टरांनी काळजी घेतली. तिला भरपूर प्रोटीन मिळावे, यासाठी अंडी, फळे यासोबतच डॉक्टरांनी तिळाचे लाडू करून खाऊ घातले. दिवसातून दोन वेळा राणीला दूध दिले. प्रत्येक आठवड्यात तिचे वजन मोजण्यात आले. रक्तदाब वेळोवेळी तपासण्यात आला.दोन-दोन हप्त्यांनी रक्ततपासणी करण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सोनोग्राफी करून घेण्यात आली. गर्भवती रुग्णासाठी जे-जे करावे लागते ते सर्व डॉक्टरांनी केलेच; पण त्यासोबतच चार गर्भाची यशस्वी प्रसुती हे आव्हान पेलण्यासाठी डॉक्टर ‘सेवक’ही बनले. दर १५ मिनिटांनी आवश्यक औषध दिले.गर्भपिशवीच्या आकुंचनावर लक्ष, गर्भ फिरण्याचा धोका टाळलाराणीला प्रत्यक्ष प्रसवकळा सुरू झाल्यावर डॉक्टरांपुढे खरे आव्हान होते. काहीही झाले तरी आईच्या जीवाला धोका होऊ नये, हे त्यांचे पहिले ‘लक्ष्य’ होते. अतिरक्तस्त्रावाने आईला धोका होऊ नये म्हणून आधीच दोन बॉटल रक्ताची व्यवस्था करण्यात आली. पण नंतर त्याची गरजच पडली नाही. चारपैकी पहिले बाळ बाहेर आल्यावर गर्भ पिशवीचे आकुंचन न झाल्यास दुसरे बाळ किंवा त्यानंतरच्या सर्वच बाळांची प्रसुती अशक्य झाली असती. मग सिझर करण्याशिवाय पर्यायच नसता.पण असे होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सलाईनद्वारे राणीला पिटोसीन हे औषध दिले. चारही बाळ पायाळू जन्माला आले. अशा घटनेत, पहिले बाळ जन्मास आल्यानंतर गर्भातील दुसरे बाळ फिरण्याचा धोका असतो. ते गर्भात फिरल्यास प्रसुती न होण्यासोबतच आईच्या जीवालाही धोका होऊ शकतो. तो टाळण्यासाठी मग महिला डॉक्टरांनी आईचे पोट धरून ठेवले. आतील बाळांना फिरण्यापासून थांबवले आणि चारही मुलींचा जन्म पायाळूच झाला.डॉक्टर म्हणतात, आमचाही आत्मविश्वास वाढलायापूर्वी यवतमाळच्या ‘मेडिकल’मध्ये दोन गर्भ असलेल्या महिलांची प्रसुती करण्याचे प्रसंग अनेकदा आले. पण चार गर्भ असलेल्या महिलेची प्रसुती करण्याचा आमचाही हा पहिलाच प्रसंग होता. आम्ही सुरुवातीपासूनच ‘नैसर्गिक प्रसुती’ करण्याचा निर्णय घेतला होता. तो यशस्वीही झाला. आमच्या करिअरमध्ये ही घटना मार्गदर्शक ठरणार आहे. आता आमच्यामध्येही कितीही ‘क्रिटिकल’ पेशंट आला तरी उपचार करण्याचा आत्मविश्वास आला आहे, अशा शब्दात डॉ. रोहिदास चव्हाण, डॉ. निमिषा शर्मा, डॉ. सुषमा गोरे, डॉ. पूनम कुलसंगे, डॉ. भव्या दोशी, डॉ. प्रक्षल शहा यांनी आपली कृतार्थ भावना व्यक्त केली. अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांचा पुढाकार व वेळोवेळी केलेले मार्गदर्शनसुद्धा तेवढेच महत्वपूर्ण ठरल्याचे या डॉक्टरांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टर