शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

 सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचा - पालकमंत्री मदन येरावार  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 6:15 PM

सहकाराच्या क्षेत्रात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे योगदान मोठे आहे. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यांनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार घेऊन सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.

यवतमाळ - सहकाराच्या क्षेत्रात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे योगदान मोठे आहे. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यांनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार घेऊन सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्रोतगृह सभागृहात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर सरेगावकर, सहकारी बँकेचे संचालक नितीन खर्चे, सहकार भारतीचे अध्यक्ष अमित भिसे, सुदर्शन भालेराव, राजू जाधव, उपनिबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते.देशाला सहकार क्षेत्राची ओळख महाराष्ट्राने करून दिली, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, “बिना सहकार, नाही उध्दार” ऐवजी आता “ बिना संस्कार…नाही सहकार” असा विचार करण्याची गरज आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेल्या विचारावर मार्गक्रमण केले तर समाजातील शेवटच्या उपेक्षित माणसापर्यंत लाभ पोहचण्यास मदत होईल. सर्वसामान्य शेतक-यांचा जवळचा संबंध सहकार क्षेत्रासोबत येत असतो. जिल्ह्यात शेतक-यांची संख्या जवळपास 4 लक्ष 60 हजार ऐवढी आहे. कर्जमाफीसाठी या सर्व शेतक-यांची जनसुविधा केंद्र, सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टल, विविध सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या सहकार्याने ऑनलाईन नोंदणी करण्यात यश आले. कनेक्टिव्हीटीची समस्या असूनसुध्दा त्यावर मात करीत दीड महिन्यात नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार केला आहे. या माध्यमातून सहकार चळवळीचा शेवटच्या माणसासाठी उपयोग व्हावा यासाठी सहकार परिषद अधिक भक्कम होणे काळाची गरज आहे. शेखर सरेगावकर यांनी सहकार क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा. सहकाराबद्दल एक भावना निर्माण होण्यासाठी संपूर्ण विदर्भात सहकार परिषदेचे आयोजन होत आहे. विकासाचा रथ शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करीत आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंरोजगार योजना, कृषी मार्गदर्शन योजना, अंत्योदय, घरकूल जागा खरेदी योजना, सौभाग्य बिजली योजना आदी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. लोकांच्या कल्याणसाठी सरकार संवेदनशील असून त्यासाठी सहकार भारतीसारख्या संस्थांची जोड आवश्यक आहे. तूर खरेदीला प्रथमच सरकारने मुदतवाढ दिली आहे. उडीद, मूग, कापूस, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. मोबाईलवर मॅसेज आल्यानंतरच शेतक-यांनी आपला माल खरेदीसाठी आणणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतक-यांना खरेदीसाठी आता तात्काळत बसावे लागणार नाही. शेतक-यांचे हित जोपासणे महत्वाचे असून सरकार त्यादृष्टीने वाटचाल करीत आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महिला बँक, विविध पतसंस्था जनहिताचे काम करीत आहे, असे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतमाता आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सहकारी संस्था, विविध पतसंस्था, महिला बँक आदींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

31 ऑक्टो. रोजी एकता दौडचे आयोजन31 ऑक्टो. 2017 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस पाळण्यात येणार आहे. या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने 31 ऑक्टो. रोजी सकाळी 7.30 वाजता समता मैदान येथून एकता दौड आयोजित करण्यात आली आहे. या एकता दौडमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

टॅग्स :Governmentसरकार