शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

कशाचे अच्छे दिन? इथे हाताला काम नाही, राशनही भेटत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2022 5:00 AM

आठवड्यात दोन दिवस हाताला काम मिळते. इतर दिवस मोलमजुरीसाठी फिरूनही कोणी उभे करीत नाही. अशा परिस्थितीत पोट तर भरावेच लागते. घरच्या मंडळींकडून गावभर फिरून दोन पैसे जमा होतात. त्यातच लेकरं आणि आम्ही जगतो आहे. आमच्या झोपडीत अंधार आहे. राशन भेटत नाही. शासनाच्या योजना माहीत नाही. घर देतो म्हणाले, पण आमच्याजवळ जागा नाही. अशा परिस्थितीत घर कुठून बांधू, असा प्रश्न आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आमच्याकडे हाताला काम नाही, पोटभर भाकर नाही अशी सगळी परिस्थिती आहे. आम्ही स्वत: काम करतो, घरच्या बायका-पोरं भिक्षा मागतात. काहीजण लोखंड गोळा करतात. यानंतरही पोटभर अन्न मिळत नाही. अशी सगळी अवस्था आहे. कशाचे अच्छे दिन आले, आमचे तर वाईटच दिवस. आठवड्यात दोन दिवस हाताला काम मिळते. इतर दिवस मोलमजुरीसाठी फिरूनही कोणी उभे करीत नाही. अशा परिस्थितीत पोट तर भरावेच लागते. घरच्या मंडळींकडून गावभर फिरून दोन पैसे जमा होतात. त्यातच लेकरं आणि आम्ही जगतो आहे. आमच्या झोपडीत अंधार आहे. राशन भेटत नाही. शासनाच्या योजना माहीत नाही. घर देतो म्हणाले, पण आमच्याजवळ जागा नाही. अशा परिस्थितीत घर कुठून बांधू, असा प्रश्न आहे. किमान हाताला काम असले तर माणसाला चिंता राहत नाही. मात्र कामावर गेल्यावर दोन दिवस हाताला काम लागते, इतर दिवस प्रतीक्षाच करावी लागते. यामुळे आमची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. पोरांना शाळेतून मिळणारे तांदूळही बंद झाले. स्काॅलरशिपचे पैसेही येत नाही. लाॅकडाऊनने तर पोरं कोणत्या वर्गात गेले, हेपण कळले नाही. 

आठवड्यात ४०० रुपये हातात  

आमच्या कुटुंबात सात लोक आहे. चार पोरी, एक पोरगा आणि आम्ही दोघं असा सगळा परिवार आहे. दोन दिवस माझ्या मजुरीचे पैसे येतात, इतर दिवस घरची मंडळी भिक्षा मागून पैसे गोळा करतात.         - किरण हातागडे 

मला १२ वर्षं झाले. मी आजही मागूनच खात आहे. माझे पती काम करीत नाही. सगळे काम माझ्याकडेच आहे. कुणी मजुरी देत नाही. यामुळे भिक्षा मागावी लागते. यावरच कुटुंब चालते आहे.     - कविता रवी नाडे 

आम्ही भंगार विकून जे काही पैसे येतील, त्यातच कुटुंब चालविण्याचा प्रयत्न करतो. घरातील सगळे जण भंगार वेचण्यासाठी सकाळपासूनच जातात. हाताला मजुरी भेटत नाही. भंगारातून जी काही रक्कम जमा होईल, त्यातच राशनपाणी विकत आणावे लागते. आम्हाला मोफतचे धान्य आणि रेशन दुकानातील धान्य अजूनपर्यंत मिळालेले नाही. कुठलेही घरदार नाही. खुल्या मैदानात झोपड्या बांधून आम्ही राहतो आहे. नालीच्या बांधकामात आमचे घर तुटले. तेव्हापासून परिवार उघड्यावर आला आहे.     - सुनील गोकुळ हातागडे

मजुरांच्या अडचणी कायकामगार चौकात सकाळी शेकडो मजूर उभे असतात. यातील मोजक्याच मजुरांच्या हाताला काम मिळते. यामुळे कामावर डबे घेऊन पोहोचलेल्या मजुराला काम न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. अनेकजण याच ठिकाणी बसून काम मिळण्याची प्रतीक्षा करतात.

काम मिळाले तरच किराणाआठवड्यात दोन ते तीन दिवस काम मिळते. इतर दिवस मात्र इतर ठिकाणी फिरून मजुरी कमवावी लागते. मात्र मजुरी नसेल तर किराणा कुठून आणायचा, हाही प्रश्न आहे. शिवाय अनेकांना रेशन दुकानातील धान्यही मिळत नाही. अनेकांचे नवीन रेशनचे पुस्तकही विभागातून गहाळ झाले. 

बायका-पोरं भीक्षा आणि भंगारावर जगतातहाताला दोन दिवसच काम मिळत असल्याने इतर दिवशी काय करायचे, हा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत घरातील लहान, मोठ्यांसह सगळे जण गावभर फिरून भीक्षा गोळा करतात, तर काही जण भंगार जमा करून ते विकतात. यातून हातात पडलेल्या पैशातून आवश्यक वस्तू खरेदी केल्या जातात. पैसे नसतील तर कामही बाकी राहते.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड