शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

विद्यार्थ्यांनो खूशखबर ! आता शाळेत न्या एकच पुस्तक !! यंदा दप्तर ७५ टक्के होणार हलके; पहिली ते आठवीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकांची छपाई सुरू

By अविनाश साबापुरे | Published: April 21, 2023 7:35 AM

Education: पाठीवर दप्तराचे ओझे वाहून थकलेल्या बच्चेकंपनीसाठी  खूशखबर आहे. आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर त्यांच्या दप्तराचे वजन ७५ टक्के हलके होणार आहे.

- अविनाश साबापुरे यवतमाळ : पाठीवर दप्तराचे ओझे वाहून थकलेल्या बच्चेकंपनीसाठी  खूशखबर आहे. आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर त्यांच्या दप्तराचे वजन ७५ टक्के हलके होणार आहे. कारण यापूर्वी केवळ पहिल्या वर्गासाठी लागू केलेली ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक’ योजना आता पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी लागू होणार आहे. त्यामुळे सर्व जिल्हा स्तरावरून यंदा दरवर्षीपेक्षा केवळ २५ टक्के पुस्तक संचांची मागणी बालभारतीने नोंदवून घेतली असून, छपाईचे कामही सुरू करण्यात आले आहे. 

उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १५, तर विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक सत्राच्या तयारीसाठी शिक्षण विभागातील यंत्रणा कामाला  लागली आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) दरवर्षीप्रमाणे यंदाही समग्र शिक्षा अभियानातून  मोफत पाठ्यपुस्तक वितरणासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच जिल्ह्यांतून पुस्तकांची मागणी नोंदवून छपाई सुरू करण्यात आली आहे.   

आधीच झाली सुरुवात n वास्तविक बालभारतीने २०२० पासूनच दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकांचे काम हाती घेतले. मात्र पहिल्या वर्षी केवळ राज्यातील ५० तालुक्यांमध्ये पहिल्या वर्गासाठी ही पुस्तके देण्यात आली. n आता २०२३-२४ या शैक्षणिक सत्रापासून पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी व संपूर्ण राज्यातील शाळांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तके वापरली जाणार आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे हलके होणार आहे.  

असे असेल वर्गनिहाय एकात्मिक पुस्तक n वर्ग व एकाच पुस्तकात समाविष्ट विषयn पहिली व दुसरी : मराठी, इंग्रजी, गणित, खेळू-करू-शिकूn तिसरी व चौथी : मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास n पाचवी : मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास n सहावी व सातवी : मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र n आठवी : मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी