न्यायाची मागणी : दारव्हा येथील आशुतोष राठोड खूनप्रकरण दिग्रस : आशुतोष राठोड या तरुणाच्या खूनप्रकरणाच्या तपासात पोलिसांकडून हयगय केली जात आहे. या विरोधात गोर सेनेने शनिवारी तहसील कार्यालयापुढे उपोषण सुरू केले. या उपोषणाला भारिप बहुजन महासंघ व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने पाठिंबा दर्शविला. या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात गोर सेनेचे चंदन पवार, सुभाष चव्हाण, पवन आडे, रवीकुमार राठोड, लखन चव्हाण, निलेश राठोड, योगेश राठोड, दिलू चव्हाण, राम जाधव, संजय आडे, काळू आडे, रोहिदास चव्हाण, विनोद राठोड, मांगीलाल राठोड, सौरंग राठोड, रवींद्र राठोड, मारोती जाधव, प्रल्हाद जाधव, विजय राठोड, लक्ष्मण राठोड, रुपेश राठोड, किशोर चव्हाण, भावराव राठोड, पंकज जाधव, विष्णू राठोड, करण राठोड, अशोक चव्हाण, सुभाष चव्हाण, सारीपूत जाधव, किशोर कांबळे, प्रफुल्ल मुजमुले, पंकज तायडे, नितीन धुळध्वज, मधुकर सोनुने, पी.जी. राठोड, संतोष जाधव, भीमराव खोराडे, पुरुषोत्तम कुडवे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
दिग्रस तहसीलपुढे गोर सेनेचे उपोषण
By admin | Published: March 20, 2016 2:27 AM