लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सावकारीतील पैशाच्या वादातून स्थानिक दत्तचौक भाजी मार्केटसमोर दोन वर्षापूर्वी गोवर्धन ढोले याची हत्या झाली होती. या खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.अब्दूल जाहीद उर्फ राजू अब्दूल रशीद (२४), अब्दूल कादीर उर्फ सोनू अब्दूल रशीद (२७), अब्दूल रशीद अब्दूल गफ्फूर (५१) रा. तारपुरा यवतमाळ असे शिक्षा झालेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत. सावकारीच्या पैश्यातून गोवर्धन ढोले व राजू अब्दूल रशिद यांच्यात वाद होता. २७ आॅगस्ट २०१७ रोजी गोवर्धन हा मुलासह दत्तचौक भाजी मार्केट परिसरात आला असताना तिघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात गोवर्धनचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळची वेळ असल्याने मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होती. याचाच फायदा घेऊन तिन्ही आरोपी पसार झाले. याप्रकरणी पुष्पा ढोले यांच्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे, नंदकिशोर आयरे यांनी केला. दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांनी खटल्या पाच साक्षीदार तपासले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी मुलाची साक्ष ग्राह्य धरत आरोपींना संगनमताने खून केल्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा दिली. तर प्रत्येक ५० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा दिली. सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश गंगलवार यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी जमादार दिनकर चौधरी यांनी सहकार्य केले.
गोवर्धन ढोलेच्या तीन मारेकऱ्यांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 9:26 PM
सावकारीतील पैशाच्या वादातून स्थानिक दत्तचौक भाजी मार्केटसमोर दोन वर्षापूर्वी गोवर्धन ढोले याची हत्या झाली होती. या खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
ठळक मुद्देअवैध सावकारीतून दत्त चौकातील हत्याकांड : प्रत्यक्षदर्शी मुलाची साक्ष ठरली महत्वपूर्ण