लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: हिंदू पंचांगाप्रमाणे कार्तिक माणसातल्या शुक्ल पक्षात प्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते. जिल्ह्यातील अती दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी बहुल मुकुटबन येथे गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात साजरी गेली. पोळ्याला ज्या प्रमाणे बैलांना सजवतात त्याच पध्द्तीने गाईंना सजविण्यात आले. वाजत गाजत गावातून या गाईंची मोठ्या उत्साहात मिरवणूक पण काढण्यात आली. दर वर्षी सर्वात सुंदर सजलेल्या गाईला बक्षीस देण्यात येते. पण कोरोनाच्या सावटात ही परंपरा खंडीत झाली आहे. मात्र याववेळी लोकांच्या उत्साहात तिळमात्रही फरक पडलेला नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथे गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 9:30 AM