लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गोवर या आजाराचे निर्मूलन आणि रुबेला या रोगावर नियंत्रणासाठी नोव्हेंबरमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. यादृष्टीने जिल्हास्तरीय नियोजन व प्रशिक्षण कार्यशाळा येथील बचत भवनात घेण्यात आली. आरोग्य विभागातर्फे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते झाले.मोहीम राबविण्यासाठी शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, नगर परिषद आरोग्य विभाग या सर्वांचे सहकार्य घेतले जाणार आहे. मोहीम राबविताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात कशी करता येईल याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. मोहीम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करावे आणि अनुषंगिक सर्व बाबींचे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जलज शर्मा यांनी यावेळी दिल्या.लसीकरण मोहीमेची माहिती सर्व्हेलन्स आॅफीसर डॉ.एस.आर. ठोसर यांनी दिली. डॉ.पी.एस. चव्हाण यांनी गोवर व रुबेला लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. संचालन डॉ.किशोर कोशटवार यांनी केले. कार्यशाळेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दु.गो. चव्हाण, डॉ. मिलींद कांबळे, डॉ. हिवरकर, डॉ. प्रशांत पवार, डॉ.तगडपल्लीवार, डॉ. सुभाष ढोले, डॉ. प्रीेती दुधे, प्रशांत पाटील, महेंद्र भरणे, नवाडे, तिरपुडे, संतोष मेश्राम आदी उपस्थित होते.
गोवर व रुबेला लसीकरण प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 10:19 PM