दारव्हा : लोकमतच्या रक्तदान शिबिरामुळे शासकीय रक्तपेढीला मोठा आधार मिळाला. या उपक्रमामुळे चांगला रक्तसंचय होत असून आता शस्त्रक्रियेसह रखडलेली कामे मार्गी लागतील, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथे गुरुवारी आयोजित रक्तदान शिबिराला त्यांनी भेट देऊन या उपक्रमाची प्रशंसा केली. रक्तदानाविषयी असलेले गैरसमज, कोरोनाची भीती, लसीकरण अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केवळ इतरांना प्रोत्साहित न करता स्वत:ही रक्तदान करून अनेक मान्यवरांनी चांगला संदेश दिला.
पंचायत समिती सभापती सुनीता राऊत, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय राहणे, माजी उपनगराध्यक्ष सुशील राठोड, डॉ. मनोज राठोड, डॉ. नितीन भेंडे, संजय दुधे, धनगर समाज सेवा संस्थेचे विदर्भ अध्यक्ष दिलीप बांबल, खिलेश घेरवरा, सुनील आरेकर, मंडळ कृषी अधिकारी परमेश्वर कांबळे, एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक नीलेश क्षीरसागर आदी ८७ जणांनी रक्तदान केले.
नगर परिषदेचे हिरासिंग राठोड, वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद राऊत, श्रीकांत सहारे यांनी रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा केला. स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश नरवडे, त्यांची पत्नी प्राचार्य ममता नरवडे व मुलगी समीक्षा यांनी सहपरिवार रक्तदान केले. सुनीता राऊत, प्रीती खारोडे, आशा कोवे, नोगीता माडीशेट्टी, प्रतीभा जाधव आदी महिलांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
बॉक्स
शिबिराला प्रवीण भेलोंडे, प्रवीण पवार, पवनकुमार महल्ले, ऋषिकेश भारती, गौरव गाढवे, नितेश दुधे, लखन पवार, निखिल पारधी, आकाश पारधे, पवन काशीकर, सुजीतकुमार पाटील, प्रमोद मोखाडे, प्रणित बुरांडे, संदीप गायकवाड, मनोहर दुधे, मंगेश इंगोले, पंकज चव्हाण, अक्षय दहिफळकर, ज्ञानेश्वर खोडे, तुषार गावडे, विलास सरागे, राजेश राठोड, भूषण गुघाने, तुषार उघडे, रवींद्र गरजे, विशाल झाडे, गोपाल आरेकर, प्रतीक सडेदार, सतीश बोरखडे, नीलेश खरडे, नीलेश पवार, अमित ठाकरे, विनोद गंधे, जयेश जाधव, गजानन राठोड, सौरव गवई, प्रतिमा जाधव, अनुराग सपाटे, ओम कोरडे, परमेश्वर कांबळे, हिमांशू करडे, विजय मिरासे, वैभव कानकीरड, दीपक घरडीनकर, संदीप गडलींग, पवन ठाकरे, गजेंद्र अवजेकर, सागर काकडे, गोविंदा घावडे, रवींद्र तगडपल्लेवार, प्रज्वल टेकाम, वैभव टाके, सुयोग भटकर, शुभम गुल्हाने, प्रतीक पवार, प्रथमेश दहिभाते, पीयूष दोशी, प्रेम धिरण, बजरंग जाधव, चैतन्य राऊत, निकितेश खडसे, गजानन गुल्हाने, उमेश खाटीक, अमोल पखाले, मोहन इंझाळकर, नितीन राऊत, सुभाष पिसे, गणेश चौधरी, सचिन दुधाने आदींनी सहकार्य केले.
090721\20210708_150510.jpg
रक्तदान शिबीराला जिल्हा शल्यचिकित्सक तरंगतुषार वारे यांनी भेट दिली.