लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सहा कापूस संकलन केंद्रांवर बुधवारपासून खरेदीचा शुभारंभ ठरला होता. प्रत्यक्षात चारच केंद्रांवर खरेदी सुरू झाली. मुर्हूताला या केंद्रावर ४३२० रूपयांचा दर मिळाला.पणन महासंघाने नाफेडचे सब एजंट म्हणून जिल्ह्यातील चार केंद्रांवर कापूस खरेदीचा शुभारंभ केला. यात यवतमाळ, पुसद, उमरखेड आणि कळंब येथील केंद्राचा समावेश आहे. या चार केंद्रांवर पहिल्या दिवशी १३ वाहने आली. त्यातील १२० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. शुभारंभाला मोजकेच शेतकरी केंद्रावर आले. यामुळे कापूस संकलन केंद्रांवर शुकशुकाट होता. य्येथील धामणगाव मार्गावरील जिनींगमध्ये महासंघाची कापूस खरेदी सुरू झाली. कारेगाव यावली येथील शेतकरी रमाकांत कडू यांनी कापसाची पहिली गाडी आणली. मुहूर्ताला त्यांच्या १४ क्विंटल कापसाची खरेदी झाली. त्याला ४३२० रूपये क्विंटलचा दर देण्यात आला.यावेळी पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, माजी आमदार संदीप बाजोरिया, सभापती रवींद्र ढोक, गजानन डोमाळे, माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, झोनल मॅनेजर सी.पी. गोस्वामी, किशोर इंगळे, बबलू राठोड, तोलाराम चव्हाण, सुरेश पत्रीकर, रमेश भीसनकर, जलाल गिलानी, जलालउद्दीन गिलानी, जाफर गिलानी, आंनद उगलमुगले, विजय वाढई, संजय राठोड, केंद्र प्रमुख अभय गावंडे आदी उपस्थित होते.चार किलोचा कट्टाकापूस खरेदीत ८ ते १२ टक्के ओलावा असलेलाच कापूस घेतला जाणार आहे. त्यातही ९ टक्के ओलावा असल्यास प्रती क्विंटल एक किलोचा कट्टा, १० टक्के ओलावा असल्यास २ किलो, ११ टक्के ओलावा असल्यास ३ किलो आणि १२ टक्के ओलावा असल्यास प्रती क्विंटल ४ किलो कापसाचा कट्टा घेतली जाणार आहे. चुकाºयातून हा कट्टा परस्पर कापला जाणार आहे.
शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 10:57 PM
जिल्ह्यातील सहा कापूस संकलन केंद्रांवर बुधवारपासून खरेदीचा शुभारंभ ठरला होता. प्रत्यक्षात चारच केंद्रांवर खरेदी सुरू झाली. मुर्हूताला या केंद्रावर ४३२० रूपयांचा दर मिळाला.
ठळक मुद्दे४३२० चा भाव : पणन महासंघाचे सहा केंद्रांचे नियोजन, चार सुरू