शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

युतीपेक्षा आघाडीचेच सरकार बरे होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:30 IST

केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराने समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. विविध आघाड्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत आहे. शेतकरी, शेतमजुरांवर तर भाजपा-सेना युती सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी, शेतमजुरांचा सूर : सर्वच घटक वैतागले, कर्जमाफीचा गुंताही सुटेना, उलट स्थिती बिघडली

राजेश कुशवाह ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराने समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. विविध आघाड्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत आहे. शेतकरी, शेतमजुरांवर तर भाजपा-सेना युती सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आर्णी तालुक्यात विविध क्षेत्रातील नागरिकांमधून हा सरसकट सूर ऐकायला मिळतो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची नेते मंडळीही ही बाब मान्य करीत आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी तालुक्यातील दाभडी या गावी २० मार्च २०१४ ला देशभरातील शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून संवाद साधला होता. त्यावरून आता साडेचार वर्ष लोटली आहेत. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही तर उलट ती बिघडली. त्यावेळी मोदींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नसल्याचे शेतकरी वर्ग सांगत आहे.मोदींच्या २० कलमीचे काय झाले ? - अ‍ॅड. शिवाजीराव मोघेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे म्हणाले, दाभडी येथे संपूर्ण देशातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी जनतेला २० आश्वासने दिली होती. मात्र त्यातील एकाचीही पूर्तता झाली नाही. या आश्वासनांच्यावेळी हंसराज अहीर, देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित असल्याने ते याचे साक्षीदार ठरले. मात्र त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याबाबत ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. समस्या निकाली काढण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफीत शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. नोटबंदी, जीएसटीमुळे सामान्य जनतेला मोठा फटका बसला. आर्णी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कोणतीही ठोस विकास कामे झाली नाही. एकही नवीन उद्योग आला नाही. उलट तत्कालीन आघाडी सरकारने जिल्ह्यात पैनगंगा प्रकल्पासाठी ७७६ हेक्टर जमीन संपादित केली होती. प्रकल्पावर तब्बल ३५० कोटी रुपये खर्च केले होते. मात्र युती सरकारने या प्रकल्पाचे कामच बंद पाडले. म्हणूनच गेल्या साडेचार वर्षात वैतागलेली तमाम जनता युती पेक्षा आघाडीचेच सरकार बरे होते, असे जाहीररीत्या सांगत असून ही बाब शंभर टक्के खरीही असल्याचे अ‍ॅड. मोघे यांनी सांगितले.युती सरकारने सामान्य जनतेला वेठीस धरले - आमदार ख्वाजा बेगराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांनीही सरकारवर टिकेची झोड उठविली. ते म्हणाले, सरकारने कोणतीही आश्वासने पाळली नाही. शेतकºयांच्या समस्या निकाली काढण्यात सरकारला अपयश आले. सोयाबीन, कपाशीला योग्य दर नाही. विविध समाजाच्या आरक्षणाचे गुºहाळ सुरूच आहे. सरकारने सामान्य जनतेला वेठीस धरले आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढीव शुल्कावर अंकुश लावण्यातही सरकारला यश आले नाही. केवळ ‘अच्छे दिन आयेंगे’चे तुणतुणे वाजवीत दाभडी व लोणी गावाला दत्तक गाव घोषित केले. प्रत्यक्षात या गावांचाही विकास झाला नाही. त्यामुळेच पूर्वीचेच आघाडी सरकार चांगले होते, असा जनतेतील सूर असून तो खरा असल्याचे आमदार ख्वाजा बेग यांनी सांगितले.म्हणे, भाजपा-सेना विरोधी पक्षातच शोभतेशेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी, उद्योजक, बेरोजगार अशा सर्वांवरच काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकारच बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आघाडीनेच केंद्र व राज्यातील सरकार चालवावे, भाजपा-सेनेला ते जमले नाही, ते विरोधी पक्ष म्हणूनच योग्य भूमिका वठवू शकतात, अशा प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत. मागील सरकार आपत्तीच्या वेळी शेतकरी, शेतमजुरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. त्या सरकारचा खरोखरच आधार वाटत होता, असेही अनेकांनी सांगितले.

टॅग्स :Shivajirao Mogheशिवाजीराव मोघे