लोकमत न्यूज नेटवर्कनरेश मानकर/वर्षा बाशूपांढरकवडा (यवतमाळ) पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशती हल्ल्याचा तीव्र निषेध करतानाच, येत्या काळात देशाच्या संरक्षणासह समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध राहणार असल्याचे भरीव आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित महिला बचतगटांच्या महामेळाव्यात उपस्थित जनसमुदायाला दिले.उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, यवतमाळच्या वतीने आयोजित या महामेळाव्यास राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार व्यासपीठावर उपस्थित होते.पुलवामा येथील घटनेबाबत देशातील जनमानस संवेदनशील असताना, मोदींचे हे पहिलेच जाहीर भाषण असल्याने ते यावेळी काय बोलतात याकडे जनसामान्यांचे विशेष लक्ष राहणार होते. आपल्या भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी शहीद जवानांना पुनश्च एकवार श्रद्धांजली वाहिली व दोन मिनिटांचे मौन पाळण्याचे आवाहन उपस्थितांना केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी यवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, दोन महिलांना यावेळी घरांच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या.आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या २० रुग्णांची मोदी यांनी यावेळी भेट घेतली. तसेच नागपुरातील अजनी रेल्वेस्थानक ते पुणे दरम्यान सुरू होत असलेल्या हमसफर या रेल्वेगाडीचे ई उद्घाटन केले. यावेळी नागपुरातील अजनी रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या रेल्वेचे थेट प्रक्षेपण सभास्थळी करण्यात आले होते.आपल्या भाषणात मोदी यांनी, यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याचा उल्लेख करून येथे आपण विशेषत्वाने आलो असल्याचे सांगितले. या जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक नव्या योजना सुरू केल्याचा उल्लेख त्यांनी केला.जनसामान्यांचा आपल्यावर विश्वास आहे का असा सवाल त्यांनी उपस्थितांना करताच नागरिकांनी हात उंचावून आपले समर्थन त्यांना दर्शविले. तुमचा आशीर्वाद आम्हाला आहे का.. तो पुढेही राहील कां.. या मोदींनी केलेल्या प्रश्नांना जनसभेने हात उंचावीत आपला पाठिंबा दिला.२०२२ सालापर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला पक्के घरकुल देण्याचा मनोदय पंतप्रधानांनी व्यक्त करताच लोकांनी त्याला टाळ््यांच्या प्रतिसादात प्रत्युत्तर दिले.भाषणाची सुरुवात बंजारा व गोंडी भाषेतून केलीपंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाचा प्रारंभ बंजारा, कोलामी व गोंडी भाषेतून केली. या भाषेतून त्यांनी, उपस्थितांना अभिवादन केले.याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या सभेस सुमारे एक लाखांहून अधिक जनसमुदाय उपस्थित असल्याची चर्चा होती.
संरक्षणासह समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध राहील; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 1:50 PM
पांढरकवडा (यवतमाळ) पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशती हल्ल्याचा तीव्र निषेध करतानाच, येत्या काळात देशाच्या संरक्षणासह समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध राहणार असल्याचे भरीव आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित महिला बचतगटांच्या महामेळाव्यात उपस्थित जनसमुदायाला दिले.
ठळक मुद्देधीर धरा, सैन्यदलावर विश्वास ठेवाआम्ही सीआरपीएफला सांगितले आहे, जे करायचे ते करापाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे प्रतिपादन