शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लाडकी बहीण'साठी सरकार देणार दरमहा ४४ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 5:27 PM

Yavatmal : जिल्ह्यात सात लाख ३५ हजार महिलांनी बजावला मतदानाचा हक्क

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विधानसभा निवडणुकीवर लाडकी बहीण योजनेचा पूर्ण इम्पॅक्ट झाला आहे. महायुती सरकारने या योजनेत बसणाऱ्या सर्व महिलांना पूर्वी दीड हजार रुपये महिन्याचा निधी दिला. सरकार आले, तर वाढीव ६०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे सरकारला महिलांच्या खात्यात अतिरिक्त ४४ कोटी रुपये टाकावे लागणार आहे. दर महिन्याचा बजेट १५४ कोटींवर जाणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पूर्वी १५०० रुपये महिना दिला जात होता. नव्याने सरकार आल्यावर २१०० रुपये दरमहा निधी देण्याची घोषणा केली. यामुळे नव्याने सरकार येताच सरकारला लाडक्या बहिणीसाठी अतिरिक्त ६०० रुपये मोजावे लागणार आहे. यासाठी सरकारला जिल्ह्यातील महिलांसाठी ४४ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. यापूर्वी महिलांचे मत कुटुंब प्रमुखाने सांगितल्यानुसार कुठल्या तरी पक्षाला दिले जात होते. अनेक महिला मतदार मतदानाकरिता येत नव्हत्या. आता मात्र हे चित्र बदलताना पाहायला मिळत आहे. 

योजनेत समाविष्ट महिलांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा दूरध्वनी निवडणुकीच्या काळात आला. महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, पुढील काळात २१०० रुपये दरमहा दिले जातील, असे सांगितले गेले. यामुळे महिलांचा विश्वास आणखी वाढला. सरकार गेले, तर आपल्याला लाडकी बहीण योजनेतून पैसे मिळणार नाहीत. यामुळे महिलांनी महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. याचा परिणाम मतपेटीतून दिसून आला.

महिला म्हणतात 

"महिलांना स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी लाडक्या बहिणींचा निधी उपयोगी पडतो. त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी दिलेली ही मदत महिलांना उपयोगी पडते आहे. ज्या महिलांना कुठलीही मदत मिळत नाही त्यांना कुटुंबाला पुढे नेताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी ही थोडी थोडकी मदतही उपयोगी पडते. यातून आम्हा महिलांना आनंद झाला आहे. या निधीत थोडी वाढ केली तर महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. किमान सात हजार रुपये महिन्याला मिळाले तर त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होईल." - सुवर्णा कन्नारकर

"सरकारने महिलांना मदत दिली. निवडणुकीच्या तोंडावर ही मदत दिली. मदत मिळाल्याने महिला आनंदी आहेत. मात्र त्यांची ही मदत इलेक्शनचा फंडा नसावा. ही मदत कायमस्वरूपी सुरू रहावी. यासोबतच महिलांची मदत सरकारने वाढवावी. यासाठी प्रयत्न व्हायला हवेत." - शीला खंडारे

"गृहिणी म्हणून काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मिळणारी मदत आधार देणारी वाटत आहे. आजपर्यंत महिलांना अशा पद्धतीचा आधार मिळाला नाही. मुलांना आजपर्यंत जॉब मिळाला नाही. याबाबतही सरकारने लक्ष द्यायला हवे. ही मदत देताना विधवा महिलांना आर्थिक मदत देताना अधिक मदत द्यायला हवी." - बबिता गेडाम

टॅग्स :government schemeसरकारी योजनाYavatmalयवतमाळMahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस