लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रत्येक संकटात जनसामान्यांचा आवाज बनणारे ‘लोकमत’ कोरोनाच्या अवघड काळातही लोकांच्या पाठिशी उभे राहिले आहे. लॉकडाऊनमुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेल्या गरजूंना धान्याच्या किट पोहोचविल्या जात आहे. या लोकोपयोगी उपक्रमासाठी लोकमत फाऊंडेशन आणि दर्डा परिवाराने पुढाकार घेतला.समाजातील खऱ्याखुऱ्या गरजू नागरिकांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर धान्य किट वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. किट तयार करतानाही प्रत्येक व्यक्तीची गरज लक्षात घेऊन नियोजनबद्ध किट भरण्यात आल्या. विशेष म्हणजे किटमधील संपूर्ण साहित्य गरजूपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने साहित्याची संपूर्ण यादी प्रत्येक किटसोबत देण्यात आली. या किटमध्ये गहू आटा १० किलो, तांदूळ दोन किलो, तूर डाळ दोन किलो, साखर एक किलो, बेसन एक किलो, सोयाबीन रिफार्इंड तेल एक लिटर, हळद पावडर १०० ग्रॅम, मीठ एक किलो, लाल मिरची पावडर १०० ग्रॅम असे साहित्य वाटप करण्यात आले. कोणत्याही कुटूंबाला किमान २५ दिवस उदरनिर्वाह करता येईल, ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.बुधवार ६ एप्रिल २०२० पासून किट वाटपाला प्रारंंभ झाला. दर्डा परिवार आणि लोकमत परिवाराच्या उपस्थितीत मदत वाटपाला प्रारंभ झाला. गरजवंतांपर्यंत ही मदत पोहोचविली जात आहे. या मदत वाटपासाठी रवींद्र कोठारी, विजय बुंदेला, शेखर बंड, महेंद्र बोरा, आशिष विठाळकर, वंदना बोरुंदिया, प्रमोद श्रीमाळ, सुशील कटारिया, सलीम शेख, मनीष गायकवाड, बाळू भगत, प्रवीण शाहाकार, सुभाष शेंडेकर तसेच लोकमत यवतमाळ कार्यालयातील सहकारी आदींचे सहकार्य लाभत आहे.
लोकमत फाऊंडेशनची गरजूंना धान्याची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 5:00 AM
समाजातील खऱ्याखुऱ्या गरजू नागरिकांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर धान्य किट वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. किट तयार करतानाही प्रत्येक व्यक्तीची गरज लक्षात घेऊन नियोजनबद्ध किट भरण्यात आल्या. विशेष म्हणजे किटमधील संपूर्ण साहित्य गरजूपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने साहित्याची संपूर्ण यादी प्रत्येक किटसोबत देण्यात आली.
ठळक मुद्देदर्डा परिवार सरसावला : लॉकडाऊन काळात हजारो लोकांना दिलासा